'मामा, घडलं ते स्वीकारायला जड जातय; अजित पवारांच्या निधनानंतर भाचीची हृदयस्पर्शी पोस्ट; फोटो पाहून डोळे पाणावतील
- Published by:Prachi Amale
Last Updated:
कधीही पळवाट न काढणारा, imperfect पण योद्धा असलेला, बारामतीचा ढाण्या वाघ आपल्यापासून हरपला, असे म्हणत भाचीने भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेते म्हणून ओळख असलेल्या दादांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाचीने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या पोस्टमधून तिने दादांबद्दलचे प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त केली आहे.
advertisement
बारामतीच्या मातीचा, आख्खा महाराष्ट्र ज्याला दादा म्हणतो, असा बुद्धीमत्ता, ऊर्जा, प्रचंड कार्यक्षमता आणि धमक असलेला योद्धा आपल्यातून हरपला,”अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दादांनी कधीही जात, धर्म किंवा भेदभाव न करता सर्वसामान्यांसाठी अव्याहतपणे काम केले. लोकांनी दिलेल्या वेदना, टीका आणि आघात सहन करूनही मोठ्या मनाने माफ करण्याची आणि पुन्हा त्यांनाच आपलेसे करण्याची असामान्य ताकद त्यांच्यात होती, असे तिने नमूद केले आहे.
advertisement
दादांची कडक शिस्त, रोखठोक स्वभाव, स्पष्टवक्तेपणा आणि वेळेचे काटेकोर पालन यामुळे ते प्रशासनात एक आदर्श मानले जात होते. मात्र, या साऱ्या कठोरतेच्या आड त्यांचे मन अत्यंत हळवे आणि प्रेमळ होते. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या कार्यापेक्षा वैयक्तिक जीवनातील त्यांची माणुसकी अधिक मोठी असल्याचा अनुभव तिने शेअर केला आहे.
advertisement
राज्याची अर्थव्यवस्था तब्बल अकरा वेळा मांडणाऱ्या दादांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. बारामतीतील रस्ते, दूध डेअरी प्रकल्प, उद्योग, शाळा, महाविद्यालये आणि कारखाने आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतात. दादांनी भूषवलेल्या पदांपेक्षा ते माणूस म्हणून अधिक मोठे होते, असे म्हणत तिने त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडले.
advertisement
advertisement
advertisement








