advertisement

ठाण्यातील सभागृह अन् आनंद बक्षींची 2 गाणी, 84 वर्षांच्या जितेंद्र यांनी सांगितला आयुष्याचा खरा अर्थ, VIDEO

Last Updated:

Actor Jitendra Video : गीतकार आनंद बक्षी यांच्या दोन गाण्यांचं उदाहरण देत जितेंद्र यांनी आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगितला. नेहमीप्रमाणे त्यांनी उत्तम मराठी बोलत सगळ्यांची संवाद साधला.

News18
News18
पैसा, प्रसिद्धी आणि मोठी घरं मिळाली तरी चाळीतलं साधं, मनमोकळं आयुष्य आजही आठवतं अशा भावना ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी व्यक्त केल्या. लहान लहान गोष्टींमध्ये मिळणारा आनंद, शेजाऱ्यांचं प्रेम आणि आपुलकी यांची सर आज कुठेच नाही. गीतकार आनंद बक्षी यांच्या दोन गाण्यांचं उदाहरण देत जितेंद्र यांनी आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगितला. नेहमीप्रमाणे त्यांनी उत्तम मराठी बोलत सगळ्यांची संवाद साधला.
ठाण्यातील आनंदोत्सव कार्यक्रमात जितेंद्र सहभागी झाले होते. तेव्हा उपस्थित सगळ्यांची संवाद साधताना जितेंद्र यांनी चाळीतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "लहान लहान गोष्टींमध्ये इतकं प्रेम होतं. लहान गोष्टींचा इतका आनंद मिळायचा की मी सांगू शकत नाही. पुढे गेल्यानंतर, आयुष्य बघितल्यानंतर... आज मी 84 वर्षांचा आहे. मी नेहमी म्हणतो की मला जे प्रेम, आपुलकी तिथे मिळाली. लहान लहान वस्तूची त्यावेळेस खूप मज्जा यायची. आता इतकं काही आहे की ते पुरत नाही, मनाची शांती नाही."
advertisement
"एका माणसाने मला विचारलं की, तुला ते आवडायचं मग तुला कोणी सांगितलं इथे यायला, तू तिथे परत जाऊ शकतो. सांगायचं तात्पर्य असं की, गुरूनानक जींनी सांगितलं आहे की, ज्याच्याकडे आहे तोपण दु:खी आहे. ज्याच्याकडे नाही पण दु:खी आहे. सुख आपल्या मनात आहे. आयुष्य कधीच सरळ जात नाही. जिंदगी रास्ते में न जाने कितने मोड देती हैं, हर मोड पे न जाने कितने सवाल देती है, जिंदगी भर ढुंढतेही उन सवालो का जबाब. जबाब मिलने पर सवाल देती हैं."
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Maze Thane (@mazethane)



advertisement
जितेंद्र यांनी आनंद बक्षी यांच्या दोन गाण्यांचं उदाहरण देत म्हटलं, "आनंद बक्षींनी दोन गाणी लिहिली आहेत. दोघांचा अर्थ सेम आहे. आयुष्याचं संपूर्ण सार सांगतात. 'आदमी मुसाफिर हैं, आता हैं जाता हैं, आते जाते रस्ते में यादे छोड जाता हैं'. दुसरं गाणं त्यांनी राजेश खन्नांच्या फिल्मसाठी लिहिलं होतं, 'जिंदगी के सफर में जो गुजर जाते है मकाम वो फिर न आते'."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ठाण्यातील सभागृह अन् आनंद बक्षींची 2 गाणी, 84 वर्षांच्या जितेंद्र यांनी सांगितला आयुष्याचा खरा अर्थ, VIDEO
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement