Currency : भारताचे 100 रुपये इराणमध्ये किती? यामध्ये तुम्ही तिकडे काय काय विकत घेऊ शकता? लिस्ट पाहून चक्रावाल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
100 INR to Iranian Rial exchange : अनेक भारतीयांना उत्सुकता असते की, आपल्या देशातील रुपयाची किंमत इतर देशांत, विशेषतः इराणसारख्या देशात किती असेल? भारत इराणपेक्षा किती शक्तीशाली असेल? याचा अंदाजा त्याच्या चलनावरुन लावता येऊ शकतो.
सध्या जागतिक राजकारणात मध्य आशियातील घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेवर आणि चलनांच्या मूल्यावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. अनेक भारतीयांना उत्सुकता असते की, आपल्या देशातील रुपयाची किंमत इतर देशांत, विशेषतः इराणसारख्या देशात किती असेल? भारत इराणपेक्षा किती शक्तीशाली असेल? याचा अंदाजा त्याच्या चलनावरुन लावता येऊ शकतो. आजच्या घडीला इराणमध्ये युद्धाची ठिणगी पडलेली असताना तिथल्या चलनाची स्थिती काय आहे, चला जाणून घेऊ
advertisement
इराणमधील युद्धाची सद्यस्थितीइराण सध्या एका कठीण लष्करी संघर्षातून जात आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या ताज्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणमधील अनेक शहरांवर हवाई हल्ले केले आहेत.इराणचा अणू प्रकल्प आणि त्यांची लष्करी क्षमता नष्ट करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला "मेजर कॉम्बॅट ऑपरेशन्स" (Major Combat Operations) असे नाव दिले आहे.इराणनेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले असून इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या युद्धामुळे संपूर्ण मध्य आशियात तणावाचे वातावरण असून आता खनिज तेलाच्या किमती आणि चलनांचे मूल्य बदलण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
ताज्या विनिमय दरानुसार (फेब्रुवारी २०२६ ) 1 भारतीय रुपया = सुमारे 14,434 इराणी रियाल आहे.या हिशोबाने तुमचे 100 रुपये इराणमध्ये 100 रुपये = 1,4,43,429 (सुमारे 14 लाख 43 हजार) इराणी रियाल एवढा असेल.(टीप: हा दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदलांनुसार दररोज बदलू शकतो. तसेच, इराणमध्ये अधिकृत सरकारी दर आणि खुल्या बाजारपेठेतील दर यात मोठी तफावत असू शकते.)
advertisement
भारताच्या शंभर रुपयात इराणमध्ये काय मिळेल?1 लिटर दूध,"5,00,000 रियाल", सुमारे 35 रुपये1 डझन अंडी,"7,00,000 ते 8,00,000 रियाल",सुमारे 50-55 रुपये1 पाव (Bread),"1,50,000 रियाल",सुमारे 10-12 रुपयेपेट्रोल (1 लिटर),"1,00,000 रियाल (सबसिडी असल्यास)",सुमारे 7-8 रुपयेसाधं जेवण (रेस्टॉरंट),"10,00,000 ते 12,00,000 रियाल",सुमारे 70-85 रुपये
advertisement
एवढ्या मोठ्या फरकाचे कारण काय?भारताचे 100 रुपये इराणमध्ये लाखांच्या घरात जाण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेने इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे त्यांचे चलन कमकुवत झाले आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला असून चलनाची घसरण वेगाने होत आहे. इराणमध्ये महागाईचा दर खूप जास्त असल्याने तिथल्या चलनी नोटांची संख्या मोठी आहे, पण त्याचे मूल्य कमी आहे.
advertisement
advertisement







