थंडगार पाण्यासाठी माठ कसा निवडायचा? काळा की लाल चांगला कोणता?
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दिवसेंदिवस उष्णतेचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बाजारात हमखास मातीच्या वस्तूंचे, मडक्यांचे स्टॉल दिसतायत. पण भेसळ मातीमुळे ओरिजनल आणि डुप्लिकेट मातीची भांडी ओळखणं कठीण असतं.
ठाणे : दिवसेंदिवस उष्णतेचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बाजारात हमखास मातीच्या वस्तूंचे, मडक्यांचे स्टॉल दिसतायत. पण भेसळ मातीमुळे ओरिजनल आणि डुप्लिकेट मातीची भांडी ओळखणं कठीण असतं. त्यामुळे लोकांची फसवणूक होते. त्यामुळे मातीची भांडी किंवा मडके विकत घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? याबद्दलची माहिती विक्रेते विजय कुंभार यांनी दिली आहे.
कडक उन्हामुळे तापमानाचा पारा वाढलाय. यामुळे उष्णतेचा त्रास व्हायला लागतो आणि प्रचंड तहानही लागते. ही तहान भागवण्यासाठी थंडगार पाणी पिण्याची इच्छा होते. यासाठी बरेच लोक फ्रीजचं थंड पाणी पितात. यामुळे तात्पुरती तहान भागू शकते पण आरोग्याचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. यामुळे अनेकजण आरोग्याचा विचार करून ओरिजनल मातीच्या भांड्यात किंवा मडक्यातील पाणी पितात.
advertisement
मडक्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे अनेक फायदे आहेत. परंतु, भेसळ असलेल्या मातीचं मडकं विकत घेऊन त्यातील पाणी पिऊन आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. कारण भेसळ माती वापरून आणि पेंट केलेली मडकी मार्केटमध्ये विक्रीला आणलेली असतात. या मडक्यातील पाणी पिल्यानंतर आरोग्य धोक्यात येऊ शकतं. यामुळे तुम्हाला तोंड येणं आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात, असं विक्रेते विजय कुंभार सांगतात.
advertisement
मातीची भांडी किंवा मडके विकत घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
1. जर मातीचं भांडं किंवा मडकं दिसायला चमकदार असेल, तर ते विकत घेऊ नका. कारण जुन्या पद्धतीनं बनवलेल्या मडक्यावर कोणत्याही प्रकारची चमक नसते. असं कलरिंग केलेलं लाल मडकं पेंट किंवा वार्निशचा वापर करून बनवलेलं असतं. जे डोळ्यांना खूप आकर्षित करतं. अशा मडक्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक असतं.
advertisement
2. कधीही मडके खरेदी करतेवेळी त्या मडक्यात एखादं कॉईन टाकून हलकेच हलवून बघा. मडक्याचा आवाज जोरदार येत असेल, तर मडकं चांगलं आहे. तुम्ही हे मडकं विकत घेऊ शकता. फक्त फुटलेलं नाही ना, याची पूर्ण खात्री करा. अशा प्रकारे मातीची मडकी खरेदी करताना काळजी घ्यावी.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 6:19 PM IST





