advertisement

Success Story : 10 महिलांच्या सोबतीने सुरू केला बिझनेस, संजीवनीताईंनी उभारला कंपनी, वर्षाला 15 लाख नफा!

Last Updated:

पारंपरिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड दिली की कोणताही व्यवसाय यशस्वी ठरू शकतो हे जालन्यातील संजीवनी जाधव यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

+
News18

News18

जालना : अनेक गृहिणी महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. पारंपरिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड दिली की कोणताही व्यवसाय यशस्वी ठरू शकतो हे जालन्यातील संजीवनी जाधव यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आवळा प्रक्रिया उद्योगातून लाखो रुपयांची वार्षिक उलाढाल संजीवनी जाधव करत आहेत. पाहुयात, संजीवनी जाधव यांचा प्रवास कसा झाला.
कशी केली व्यवसायाला सुरुवात? 
संजीवनी जाधव या जालना शहरात एक सामान्य गृहिणी म्हणून राहत होत्या. परंतु आपणही काहीतरी करावे, कमाईचा मार्ग निर्माण करावा म्हणून त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे आवळा प्रक्रिया उद्योग यावरील प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2009 मध्ये त्यांनी 10 महिलांना सोबत घेऊन बचत गट सुरू केला.
advertisement
कोणकोणते बनवतात पदार्थ? 
त्यानंतर त्यांनी आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले. यामध्ये आवळ्यापासून लोणचे, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी, आवळा पावडर इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांची निर्मिती यशस्वी झाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी, जालना येथे मोठ्या स्तरावर लेबलिंग करून हा उद्योग वाढवला.
advertisement
किती होतो नफा? 
या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना वार्षिक 25 ते 30 लाखांची उलाढाल होऊन 12 ते 15 लाख रुपये निव्वळ नफा राहतो. संजीवनी जाधव हे पदार्थ विविध प्रदर्शनामध्ये विक्री करतात. त्यासोबतच त्या इतर महिलांनाही व्यवसायाचे मार्गदर्शन करतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : 10 महिलांच्या सोबतीने सुरू केला बिझनेस, संजीवनीताईंनी उभारला कंपनी, वर्षाला 15 लाख नफा!
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement