Vasai Accident: आधी पायी चालणार्याला उडवलं, मग लोखंडी बॅरिकेड्सला धडक; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
वसईमधील मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये तीन तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पालघर: वसईतून एक महत्त्वाची बातमी येत आहे. वसईमधील मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (27 फेब्रुवारी) रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये तीन तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करून घेतला आहे. घटनेची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. भीषण अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ईश्वर साव, शाहरूख फुलजहाँ खान आणि अर्जुन शेट्टी अशा तीन तरूणांचा समावेश आहे.
मृत्यूमुखींची नावे
नायगाव पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा दोन तरूण बाईकवरून मुंबईकडून नालासोपाऱ्याच्या दिशेने येत होते. बाईकचा स्पीड जास्त असल्यामुळे तो नियंत्रणाच्या बाहेर होता. चिंचोटी परिसरातील साधना हॉटेल जवळ 19 वर्षीय ईश्वर साव हा तरूण रस्ता ओलांडत असताना मुंबईवरून नालासोपाऱ्याच्या दिशेने शाहरूख आणि अर्जुन यांची बाईक भरधाव वेगाने येत होती. त्यांच्या बाईकचा वेग नियंत्रणात येण्याच्या पलीकडचा होता. बाईकचा वेग नियंत्रणाबाहेर असल्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या या बाईकने ईश्वरला धडक दिली. या धडकेमध्ये ईश्वर साव हा तरूण गंभीर जखमी होता. पण वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
घटना कशी घडली?
या अपघातामध्ये शाहरूख आणि पाठी बसलेला अर्जुन हे दोन्हीही तरूण गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुद्धा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की, अपघातानंतर या तरूणांची बाईक बऱ्याच अंतर दूर गेली. धडकेनंतर मोटारसायकल रस्त्यावरील लोखंडी बॅरिकेड्सवर आदळली. घटनेनंतर पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून लगेचच शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवून स्वत:सह इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे प्रकरणी शाहरुख खान वर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
advertisement
पोलिस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, भादविच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि इतर गोष्टींचाही सखोल तपास केला जात आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर वेगाने आणि बेजबाबदार पणे वाहन चालवण्याचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक वाहतूक नियंत्रण लागू करावे आणि परिसरात सुरक्षा बळकट करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
Location :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 6:40 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Accident: आधी पायी चालणार्याला उडवलं, मग लोखंडी बॅरिकेड्सला धडक; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू







