TRENDING:

जमीन, बांधकाम प्रकल्पाबाबत फसवणूक झाली आहे का? रेरा अंतर्गत कारवाई कशी करायची?

Last Updated:

Property Rules : घर खरेदी, जमीन व्यवहार किंवा बांधकाम प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (रेरा) हा कायदा लागू करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : घर खरेदी, जमीन व्यवहार किंवा बांधकाम प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (रेरा) हा कायदा लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र रेरा (MahaRERA) ही संस्था थेट ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करते. एखाद्या जमिनीबाबत किंवा बांधकाम प्रकल्पाबाबत फसवणूक झाली, चुकीची माहिती दिली गेली, प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास अथवा तुमचा हक्क अबाधित राहिला नाही, तर रेरा अंतर्गत तक्रार करता येते. मात्र ही तक्रार कशी करावी, याची माहिती अनेकांना नसते. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया.
Property Rules
Property Rules
advertisement

तक्रार का करायची?

प्लॉट किंवा जमिनीची चुकीची माहिती दिली गेली असेल.

जमिनीचा ताबा वेळेत न दिल्यास.

जमीन रजिस्ट्रेशनमध्ये गोंधळ असल्यास.

प्लॉटिंग प्रकल्पात परवानगीशिवाय बांधकाम सुरू असल्यास.

विकासक/डेव्हलपरने जाहिरातींमध्ये दिलेल्या अटी पाळल्या नाहीत.

रेरा अंतर्गत तक्रार कशी करायची?

1) ऑनलाईन नोंदणी

महाराष्ट्र रेराची अधिकृत वेबसाईट (https://maharera.mahaonline.gov.in ) वर जाऊन ‘Complaint Registration’ हा पर्याय निवडावा.

advertisement

2) लॉगिन व नोंदणी

तक्रारदाराने आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी वापरून लॉगिन करावे. नवीन वापरकर्त्यांना नोंदणी करावी लागेल.

3) तक्रारीचे तपशील भरणे :

प्रकल्प/जमिनीचे नाव व पत्ता

डेव्हलपर/बिल्डर/जमीन मालकाची माहिती

झालेल्या त्रासाचे स्वरूप

आधार पुरावे (करारपत्र, पावत्या, जाहिराती, सातबारा उतारा इ.)

4) फी भरणे

रेरा अंतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी निश्चित शुल्क भरावे लागते. सध्या ऑनलाईन पेमेंट डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे करता येते.

advertisement

5) तक्रार सबमिट करणे

सर्व माहिती भरून व कागदपत्रे अपलोड करून तक्रार सबमिट केली जाते. तक्रार क्रमांक मिळाल्यावर त्याद्वारे पुढील स्टेटस तपासता येते.

पुढील कारवाई काय करावी? 

तक्रार नोंदवल्यानंतर रेरा प्राधिकरण प्रकरण तपासते. दोन्ही पक्षांना (शेतकरी/खरेदीदार आणि डेव्हलपर/विक्रेता) सुनावणीसाठी बोलावले जाते.

पुरावे पाहून निर्णय दिला जातो. निर्णयानुसार नुकसानभरपाई, रिफंड, प्रकल्प पूर्ण करण्याचा आदेश, किंवा इतर दंडात्मक कारवाई केली जाते.

advertisement

शेतकरी आणि खरेदीदारांसाठी फायदे

जमिनीचे व्यवहार कायदेशीर चौकटीत येतात.

फसवणुकीच्या प्रकरणात थेट न्याय मिळतो.

वेळेवर जमीन किंवा घराचा ताबा मिळण्याची हमी मिळते.

गैरव्यवहार करणाऱ्या डेव्हलपरवर कठोर कारवाई होते.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड / पॅन कार्ड (ओळखपत्र)

खरेदी-विक्री करारपत्र किंवा नोंदणी कागदपत्रे

पावत्या, पैसे भरल्याचे पुरावे

सातबारा उतारा किंवा जमीन नोंद दाखला

advertisement

संबंधित जाहिराती, ब्रोशर किंवा करारातील अटींची प्रत

मराठी बातम्या/कृषी/
जमीन, बांधकाम प्रकल्पाबाबत फसवणूक झाली आहे का? रेरा अंतर्गत कारवाई कशी करायची?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल