Refrigerator: तुम्हीही फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न खाताय? होऊ शकतात भयंकर परिणाम VIDEO

Last Updated:

Refrigerator: रेफ्रीजरेटर म्हणजेच फ्रीज हे प्रत्येक घराचा अविभाज्य घटक झाला आहे. यामध्ये अनेक खाद्यपदार्थ साठवून ठेवले जातात.

+
Refrigerator:

Refrigerator: तुम्हीही फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न खाताय? होऊ शकतात भयंकर परिणाम VIDEO

बीड: सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत रेफ्रीजरेटर म्हणजेच फ्रीज हे प्रत्येक घराचा अविभाज्य घटक झाला आहे. अन्न जास्त दिवस टिकावे, वेळ वाचावा आणि अन्न वाया जाऊ नये यासाठी अनेकजण भाजी, भात, डाळ किंवा मांसाहारी पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात. तज्ज्ञांच्या मते, फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नाचा आरोग्यावर चांगला आणि वाईट, असा दोन्ही प्रकारे परिणाम होतो.
अन्न फ्रीजमध्ये ठेवल्याने ते लगेच खराब होत नाही. त्यामुळे घरातील अन्न सुरक्षित राहते आणि अनेक कुटुंबांची आर्थिक बचत होते. पण, दीर्घकाळ फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न गरम करून खाल्लं तरी त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात. विशेषतः फ्रीजमधील अन्नातून व्हिटॅमीन 'सी' आणि 'बी' लवकर कमी होतात. त्यामुळे अन्न ताजं दिसलं तरी पोषणमूल्य कमी झालेली असतात.
advertisement
शिजवलेलं अन्न दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यावर सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो. काही जीवाणू अन्न गरम केल्यानंतरही नष्ट होत नाहीत. त्यांच्यातील विषारी घटकांमुळे विषबाधा, जुलाब, पोटदुखी किंवा उलट्या होण्याचा धोका वाढतो. लहान मुलं, गरोदर महिला आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये याचे परिणाम अधिक गंभीर ठरू शकतात.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, फ्रीज योग्य तापमानावर (0°C ते 5°C) वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शिजवलेलं आणि कच्चं अन्न एकत्र ठेवू नये अन्यथा क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका निर्माण होतो. अन्न एअरटाइट डब्यात ठेवलं, तर ते सुरक्षित राहत. उघड्या भांड्यात ठेवलेलं अन्न फ्रीजमधील इतर वास शोषून घेते, त्यामुळे त्याची चव आणि गुणवत्ता बदलते.
आरोग्याच्यादृष्ट्याने पाहता, शक्य तितके ताजे आणि गरमागरम अन्न खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. वारंवार थंड अन्न खाल्ल्याने अपचन, गॅस, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या वाढतात आणि पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे फ्रीजचा वापर केवळ आवश्यकतेपुरता करावा. ताजे अन्न अधिक प्रमाणात खावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असं आहारतज्ज्ञांचं मत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Refrigerator: तुम्हीही फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न खाताय? होऊ शकतात भयंकर परिणाम VIDEO
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement