Weather Alert: शनिवारी हवामानात मोठे उलटफेर, मुंबई-पुण्यासह मराठवाड्याला अलर्ट

Last Updated:
Weather Alert: मकर संक्रांतीनंतर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 17 जानेवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
नवीन वर्षाची सुरुवात होताच हिवाळा निरोप घेईल, अशी अपेक्षा असतानाच महाराष्ट्रात मात्र थंडीचा प्रभाव अद्याप कायम असल्याचं चित्र आहे. सकाळी आणि रात्री गारठा जाणवत असून, दुपारी सूर्यप्रकाशामुळे तापमानात वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 जानेवारी रोजीही राज्यात थंडी, धुके आणि तापमानातील चढ-उतार सुरूच राहणार आहेत.

advertisement
2/5
कोकण किनारपट्टीवर हवामान मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत हलके धुके पडू शकते, तर रात्री गारवा जाणवेल. गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसानंतर आता कोकणात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. दुपारी उष्णता जाणवेल, मात्र पहाटे आणि रात्री हवेत गारवा राहील.

3/5
पश्चिम महाराष्ट्रात पहाटे आणि सकाळी थंडी जाणवेल, त्यानंतर दिवसभर हवामान कोरडं राहणार आहे. पुण्यात कमाल तापमान 29 ते 31 अंश, तर किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस राहील. घाटमाथ्यावर अंशतः ढगाळ वातावरण असून, हलक्या पावसाची शक्यता काही ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सातारा परिसरात थंडीचा कडाका काहीसा कमी होईल.

4/5
मराठवाड्यात हिवाळ्याचा कडाका अधिक जाणवणार आहे. येथे किमान तापमान 12 ते 15 अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता असून, काही भागांत दाट धुके आणि थंड वारे वाहतील. रात्री आणि पहाटे गारठा तीव्र राहणार आहे. विदर्भात थंडीचा प्रभाव सर्वाधिक जाणवेल. नागपूरमध्ये कमाल तापमान 29 ते 31 अंश, तर किमान तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. इतर विदर्भातील जिल्ह्यांतही थंड लाट कायम राहणार आहे.

5/5
एकंदरीत, राज्यात पुढील काही दिवस कोरडे ते अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री थंडी व धुके, तर दुपारी उष्णता जाणवेल. तापमानात चढ-उतार सुरूच राहणार असून, नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement