Shivsena: 'ठाकरे ब्रँड जिंदा है', शिवसेना कुणाची? मुंबईकरांनी 3 निवडणुकीत लावला खरा निकाल
- Published by:Sachin S
Last Updated:
महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू जिंकले नसले तरी ठाकरे हा ब्रँड पुसवू सुद्धा शकले नाही. शिवसेना कुणाची आहे, याचा निकाल आज मुंबईकरांनी विजयी जागांमधून स्पष्ट करून दाखवला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्यानंतर पालिका निवडणूक एकत्र लढणार अशी घोषणा केली आणि निवडणूक लढवली. पण, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, असं म्हणून भाजपने टीका केली. पण, महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू जिंकले नसले तरी ठाकरे हा ब्रँड पुसवू सुद्धा शकले नाही. शिवसेना कुणाची आहे, याचा निकाल आज मुंबईकरांनी विजयी जागांमधून स्पष्ट करून दाखवला आहे.
advertisement
शिवसेना म्हणजेच ठाकरे. हे मुंबईच्या मतदारांनी स्पष्टपणे निकाली काढलं आहे. महापालिकाच्या निकालात ठाकरे गटा मुंबई पालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना गट स्थापन करून अडीच सत्ताधारी भाजपच्या बाजूला जाऊन बसले. पण तरीही मुंबईकरांनी शिंदेंना २८ जागा देऊन शिवसेना तुमची नाही, हे स्पष्टपणे निकालातून सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अखेरीस, मुंबईच्या मतदारांनी ठाकरे बंधूंना खास करून मराठी मतदारांनी भरभरून मतदान दिलं. ठाकरे बंधूंनी ७२ जागा जिंकल्या. ठाकरे गटाने सर्वाधिक ६५ जागा जिंकल्या. ठाकरे गट हा पालिकेत दोन नंबरचा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर मनसेला ६ जागांवर विजय मिळाला. पण, शुन्य झालेल्या जागा आता ६ मध्ये आल्या आहेत. त्यामुळे मनसेला हा आकडा मैदानात उभं राहण्यासाठी भरपूर आहे.
advertisement
तर दुसरीकडे शिंदे गटाला मुंबईच्या मराठी मतदारांनी २८ जागांवर विजय मिळवून दिला. मुळात ही निवडणूक भावनिक मुद्यावर लढली गेली. मुंबईतला मराठी मतदार हा ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो. मागील 2017 च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या होत्या. आता जागा कमी होऊन ६५ झाल्या आहेत. पण जागा जरी झाल्या असल्या तरी शिवसेना कुणाची आहे, हे मुंबईकर मराठी मतदारांनी निकाली काढलं आहे.








