Success Story : पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
यंदा देखील त्यांनी 3 एकर क्षेत्रामध्ये खरबूज लागवड केली आहे. या खरबूज फळाची ते स्वतः विक्री करतात तसेच व्यापाऱ्यांना देखील देतात.
छत्रपती संभाजीनगर : पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी कमी वेळात जास्त उत्पन्न देणाऱ्या फळबागा आणि वेलवर्गीय पीक पद्धतीकडे वळत आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील टोणगाव येथील शेतकरी लक्ष्मण आहेर हे गेल्या 6 वर्षांपासून खरबूज शेती करत आहेत. यंदा देखील त्यांनी 3 एकर क्षेत्रामध्ये खरबूज लागवड केली आहे. या खरबूज फळाची ते स्वतः विक्री करतात तसेच व्यापाऱ्यांना देखील देतात. त्यामुळे गतवर्षी आहेर यांना 18 लाख रुपयांच्या जवळपास या शेतीतून उत्पन्न मिळाले होते तसेच यंदा 20 ते 22 लाख रुपये या शेतीतून उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. याबरोबरच खरबूज शेती कशा पद्धतीने करावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
लक्ष्मण आहेर सांगतात की, टोणगाव येथे 2019 मध्ये खरबूज या फळ-पिकाच्या लागवडीला सुरुवात झाली. त्यावेळी खरबूज काढण्यासाठी आले आणि लॉकडाऊन लागले. तेव्हा एकरी 25 टन खरबूज निघत होता. नंतर ते खरबूज लॉकडाऊनमध्ये नेमकं कुठे द्यायचे हा प्रश्न पडला होता. स्थानिक व्यापारी यायचे ते एक-दोन क्विंटल खरबूज घेऊन जायचे, दोन वेळेस या व्यापाऱ्यांनी खरबूज नेले आणि दोन ते तीन तासातच ते परत खरबूज देण्यासाठी यायचे.
advertisement
त्यांना विचारले की, हे खरबूज तुम्ही कुठे विकता व्यापाऱ्यांचे उत्तर आलं आणि रस्त्यावर हे खरबूज विकतो तेव्हा डोक्यात विचार आला की, रस्त्यावर खरबूज विकू शकता, तर मी का नाही आणि त्या दिवसापासून मुकुंदवाडी, खेडेगाव, वस्ती तांडे अशा ठिकाणी खरबूज विक्री केले. त्यामुळे ठरवले या पिकाचे उत्पादन घेऊन स्वतः या फळाची विक्री करायची आणि तेव्हापासूनच खरबूज शेतीला खरी सुरुवात झाली.
advertisement
तीन एकर क्षेत्रामध्ये 20 लाखांचे उत्पन्न
खरबूज शेतीमध्ये एकरी 25 टन तर एकूण तीन एकर क्षेत्रामध्ये 75 टन खरबूज उत्पादन दरवर्षी घेतले जाते. खरबुजाची लागवड पाच बाय एक वर करण्यात आली आहे, तसेच एकूण तीन एकर शेतीत 18 ते 19 हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या तरी या पिकाची समाधानकारक स्थिती आहे. त्यामुळे 20 ते 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे देखील आहेर यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
खरबूज शेती कशी करावी?
खरबूज शेती करायची झाल्यास सुरुवातीला ज्या ठिकाणी आपल्याला ही शेती करायची आहे तेथे जमिनीची चांगली मशागत करावी लागते, पाच फुटावर बेड पाडायचे आहेत, त्यानंतर शेणखताचे मिश्रण करून टाकायचे आहे. याबरोबरच जैविक शेती करायची झाल्यास गांडूळ खत, शेणखत तसेच रासायनिक खत असा भेसळ डोस करून वापरला आहे. खरबूज शेती ही 70 ते 80 दिवसांची असल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील या शेतीत उतरायला हवे, त्यामुळे कमी वेळात चांगले उत्पन्न देखील मिळते.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 9:28 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video








