Salman Khan Warrant: सलमान खानच्या विरोधात वॉरंट! आता अटक निश्चित? पण नेमकं झालं तरी काय
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salman Khan Warrent: बॉलिवूडचा 'सुलतान' सलमान खान पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. यावेळी प्रकरण काळवीट शिकार किंवा 'हिट अँड रन'चं नाही.
advertisement
advertisement
नेमकं प्रकरण असं आहे की, सलमान खान 'राजश्री पान मसाला' या उत्पादनाची जाहिरात करतो. या जाहिरातीत हे उत्पादन केसरयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, याचिकाकर्ते योगेंद्र सिंह यांनी यावर आक्षेप घेत ग्राहक न्यायालयात धाव घेतली. "अशा जाहिरातींमधून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे," असा आरोप त्यांनी केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
न्यायालयाने आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे की, "खोटे दावे करून किंवा ग्राहकांना फसवून जाहिरात करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. सेलिब्रिटींनी जाहिरात करताना त्यातील दाव्यांची सत्यता तपासणे गरजेचे आहे." आदेशाची वारंवार अवहेलना करणाऱ्या कंपन्या आणि ब्रँड अँम्बेसेडर्सना या कारवाईतून एक मोठा इशारा देण्यात आला आहे.
advertisement










