प्रचारासाठी वणवण फिरली, पण मतदानाला मारली दांडी; बॉलिवूड अभिनेत्रीचा ठाकरेंच्या शिवसेनेला डच्चू? थेट देश सोडला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बॉलिवूड अभिनेत्रीने शिवसेना (ठाकरे गट) आणि पर्यायाने महाविकास आघाडीसाठी ज्या पद्धतीने रान उठवलं होतं, ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
advertisement
advertisement
advertisement
साधा कुर्ता, गळ्यात मशालीचं चिन्ह असलेला लाल स्कार्फ आणि चेहऱ्यावर हास्य... रवीनाने सर्वसामान्यांशी संवाद साधत मते मागितली. तिची ही सक्रियता पाहून शिवसैनिकांना वाटलं होतं की, मतदानाच्या दिवशी रवीना सर्वात आधी रांगेत उभी असेल. मात्र, गुरुवारी जेव्हा मुंबईकर मतदान केंद्रावर धावत होते, तेव्हा रवीना मात्र परदेशात रवाना झाली होती.
advertisement
रवीनाने इतका प्रचार करूनही मतदान का केलं नाही? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. एका वृत्तानुसार, रवीनाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, रवीनाला एका कौटुंबिक समस्येमुळे अचानक परदेशी जावं लागलं. घरात काहीतरी तातडीचं काम निघाल्यामुळे तिला मतदानापेक्षा कौटुंबिक जबाबदारीला प्राधान्य द्यावं लागलं.
advertisement
यंदाच्या महापालिका निवडणुकीत केवळ रवीनाच नाही, तर बॉलीवूडच्या अनेक बड्या स्टार्सनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. शाहरुख खान, दीपिका पादुकोण, अजय देवगण, काजोल, हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा आणि संपूर्ण बच्चन कुटुंब या यादीत होतं. कतरिना कैफ, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांसारखे दिग्गजही यंदा मतदान केंद्रावर दिसले नाहीत.
advertisement
दुसरीकडे, निवडणुकीच्या निकालांचे कल हाती येत असून यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू मराठी अस्मितेसाठी एकत्र आले खरे, पण मतदारांनी मात्र वेगळाच कौल दिल्याचे प्राथमिक कल सांगत आहेत. रवीनासारख्या स्टार्सनी प्रचार करूनही मतदानाच्या आकड्यांवर आणि निकालावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही.









