BMC Election Result: ठाकरेंचा गेम कुणी बिघडवला? 'त्या' वॉर्डांमधील आकडे पाहून तुम्हीही चक्रावून जाल!

Last Updated:

BMC Election Results : मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) युतीचा थेट फटका शिवसेना (UBT) आणि ठाकरे बंधूंना बसल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाकरेंचा गेम कुणी बिघडवला? 'त्या' वॉर्डांमधील आकडे पाहून तुम्हीही चक्रावून जाल!
ठाकरेंचा गेम कुणी बिघडवला? 'त्या' वॉर्डांमधील आकडे पाहून तुम्हीही चक्रावून जाल!
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत आता एक अत्यंत महत्त्वाचे समीकरण समोर येत आहे. ज्या 'मतांच्या विभाजनाची' (Vote Split) भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती, तीच भीती आता खरी ठरताना दिसत आहे. मुंबईतील अनेक वॉर्डमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) युतीचा थेट फटका शिवसेना (UBT) आणि ठाकरे बंधूंना बसल्याचे स्पष्ट होत आहे.
advertisement
मुंबईत शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यात आघाडीची घोषणा असली, तरी प्रत्यक्षात जागावाटपाचा तिढा सुटला नाही. परिणामी अनेक वॉर्डांत मविआचे दोन-तीन उमेदवार परस्परविरोधी उभे राहिले. या परिस्थितीत मतांची विभागणी झाली आणि भाजपला कमी मताधिक्यानेही अनेक जागांवर विजय मिळवता आला.

नेमकं समीकरण काय बिघडलं?

या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडत प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'सोबत हातमिळवणी केली होती. या नव्या 'मुंबई विकास आघाडी'ने प्रामुख्याने मुस्लीम आणि दलित बहुल वॉर्डांमध्ये आपली ताकद लावली.
advertisement

>> कोणत्या वॉर्डमध्ये काँग्रेस-वंचितने बिघडवला ठाकरेंचा गेम?

>> प्रभाग क्रमांक 20
दीपक तावडे -बीजेपी -10,258
दिनेश साळवी एमएनएस-7530
मस्तान खान -कांग्रेस-3351
>> प्रभाग क्रमांक 23
शिव कुमार झा- भाजप -7090
किरण जाधव -एमएनएस -5810
आर पी पांडे-कांग्रेस -1317
>> प्रभाग क्रमांक 1
> रेखा यादव शिंदे 7544 मत
> काँग्रेसच्या शीतल म्हात्रे 5070 मत
advertisement
> ठाकरेंच्या फोरम परमार यांना 3414 मत
>> प्रभाग क्रमांक 52
> प्रीति सातम भाजप 9971
> सुप्रिया गाडावे UBT 8953
> स्वाती सांगळे काँग्रेस 1399
>> प्रभाग १२६
> अर्चना भालेराव -बीजेपी -11134
> शिल्पा भोसले -यूबीटी -10,263
> साजिदा खान -काँग्रेस -1065
>> प्रभाग क्रमांक १६६
मीनल तुर्डे - शिंदे 6435
advertisement
राजन खैरनार-मनसे 4480
घनशाम भापकर-काँग्रेस -3286
>> प्रभाग क्रमांक 174
साक्षी कनोजिया -बीजेपी 5,523
पद्मावती शिंदे - ठाकरे गट 3,078
ईश्वरी वेलु -कांग्रेस - 2,921
>> वॉर्ड नंबर 175
> मानसी सातमकर -शिंदे 6,895
> ललिता यादव -काँग्रेस -6,646
> अर्चना कासले -मनसे -2,759
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Result: ठाकरेंचा गेम कुणी बिघडवला? 'त्या' वॉर्डांमधील आकडे पाहून तुम्हीही चक्रावून जाल!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement