Pune PMC Result : तेलंही गेलं तुपही गेलं! पुण्याच्या 'जायंट किलर'ला धक्क्यावर धक्के, गणेश बुडकरांनी धंगेकरांच्या मुलाला चारली धूळ!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune PMC Election Result ward no 24 Ravindra dhangekar : पुण्याच्या राजकारणात 'जायंट किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धंगेकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मिळवलेला हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Pune PMC Election Result : पुणे महानगरपालिकेतील सर्वात प्रतिष्ठेच्या लढतीचा निकाल आता जाहीर झाला आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या लढतीत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना मोठा राजकीय धक्का बसला. रविंद्र धंगेकरांचे पुत्र प्रणव धंगेकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून, भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते गणेश बिडकर यांनी हा विजय संपादन केला आहे. गणेश बिडकर यांनी तब्बल 9234 मतांच्या मोठ्या फरकाने प्रणव धंगेकर यांना धूळ चारली. मागील निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता, मात्र यावेळेस बिडकरांनी त्या पराभवाचा वचपा काढला आहे.
धंगेकरांना दुहेरी धक्का
धंगेकर कुटुंबासाठी हा निकाल दुहेरी धक्का देणारा ठरला आहे, कारण प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रभाग 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी त्यांचा पराभव केला. एकाच वेळी घरातील दोन्ही प्रमुख उमेदवार पराभूत झाल्याने धंगेकर समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. पुण्याच्या राजकारणात 'जायंट किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धंगेकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मिळवलेला हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
advertisement
'महापौर साहेब' झाल्याचे बॅनर
म्हणतात पुण्याचं राजकारण ज्या कसब्यातून फिरतं, तिथं निकालापूर्वीच चुरस पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार गणेश बिडकर हे नगरसेवक म्हणून निवडून आल्याचे आणि थेट 'महापौर साहेब' झाल्याचे बॅनर शहरात लावण्यात आले होते. अशातच आता बिडकर पुण्याचे महापौर होणार का? असा सवाल विचारला जात आहे. मुरलीधर मोहोळ यांचे खास म्हणून गणेश बिडकर यांची ओळख आहे. त्यामुळे आता पुण्यातील चित्र क्लियर होताना दिसत आहे.
advertisement
भुवया उंचावल्या
दरम्यान, पुण्यात गणेश बिडकर यांचे विजयाचे फलक झळकल्याने पुण्यात मात्र भुवया उंचावल्या आहेत. कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल केइएम हॉस्पिटल या प्रभाग क्रमांक 24 मधून गणेश बिडकर यांनी निवडणूक लढविली आहे. त्यांच्या विरोधात माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांचे सुपुत्र प्रणव रिंगणात उतरले होते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 8:17 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune PMC Result : तेलंही गेलं तुपही गेलं! पुण्याच्या 'जायंट किलर'ला धक्क्यावर धक्के, गणेश बुडकरांनी धंगेकरांच्या मुलाला चारली धूळ!










