कडाक्याच्या थंडीमुळे केळी बागेला फटका, असं करा संरक्षण, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
केळी सारख्या उष्ण हवामानात वेगाने वाढणाऱ्या पिकांमध्ये वाढ खुंटणे, पाने करपणे असे प्रकार पहायला मिळत आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
जालना : राज्यात या वर्षी सामान्यापेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळे थंडीचे प्रमाण अधिक आहे. या गारव्याचा अनेक पिकांना चांगला फायदा देखील होत आहे. परंतु, केळी सारख्या उष्ण हवामानात वेगाने वाढणाऱ्या पिकांमध्ये वाढ खुंटणे, पाने करपणे असे प्रकार पहायला मिळत आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. वाढत्या थंडीपासून केळी बागांचे संरक्षण कसे करावे? याबद्दलचं कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील कृषी तज्ज्ञ राहुल चौधरी यांनी माहिती सांगितली आहे.
केळी पिकाची लागवड वाढू लागली आहे. गारठा वाढतो याचा अर्थ तापमान नैसर्गिकरित्या कमी होते. यामुळे जमिनीचे तापमान देखील कमी होते आणि यामुळे केळी पिकाची अन्न शोषण करण्याची प्रक्रिया मंदावते. त्याचबरोबर थंड हवा जेव्हा हिरव्या पानांवरून जाते तेव्हा पानांतील पेशी तडकतात. आर्द्रतेचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण होते.
advertisement
काय करावेत उपाय?
केळी बागेची लागवड करताना चारही बाजूंनी नेपियर गवताची लागवड केल्यास फायदा होतो. जुन्या साड्या किंवा कार्डे बाजूंनी बांधून थंडीपासून संरक्षण करता येते. त्याचबरोबर बागेमध्ये काही ठिकाणी धूर केल्यास देखील फायदा होतो. पाणी रात्रीच्या वेळी दिल्यास पाणी उष्णता निर्माण करते याचा पिकाला फायदा होतो. तसेच पालाशयुक्त खतांचा वापर केला तर झाडांची प्रतिकारशक्ती वाढते यामुळे केळी रोगाला कमी बळी पडतात आणि चांगली वाढ होते, असे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील कृषी तज्ज्ञ राहुल चौधरी यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 3:32 PM IST








