Vasai Virar Result 2026 : राजीव पाटलांनी ठाकूरांचा गेम केला, भाजप उमेदवार जिंकून आणला,बविआला मोठा झटका
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बहुजन विकास आघाडीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते राजीव पाटील यांनी आपले निकटवर्तीय आणि भाजप उमेदवार निलेश चौधरी यांना पाठींबा दर्शवला होता.
Vasai Virar Municipal Election Result : वसई विरार महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते राजीव पाटील यांनी आपले निकटवर्तीय आणि भाजप उमेदवार निलेश चौधरी यांना पाठींबा दर्शवला होता. तसेच त्यांनी हितेंद्र ठाकूर यांचे उमेदवार धनंजय गावडे यांना पाडा असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर आता संपूर्ण निकाल फिरला असून भाजप उमेदवार विजय झाला आहे. या निकालानंतर राजीव पाटील यांनी धनंजयला पाडा असे आवाहन केल्याने माझा विजय झाल्याचे भाजपचे विजयी उमेदवार निलेश चौधरी यांनी सांगितले.
खरं तर बहुजन विकास आघाडीत नाराज असलेले माजी महापौर राजीव पाटील बविआच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात सक्रिय झाले होते. पण अचानक राजीव पाटील हे प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपकडून
निवडणूक लढवणाऱ्या निलेश चौधरी यांच्या भेटीला गेले होते. या भेटी दरम्यान त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गावडे उलटा झाला पाहिजे, असे उद्गार काढले.त्यांचे हे उद्गार पाहून त्यांनी एकप्रकारे निलेश चौधरी यांना पाठींबा दर्शवला.या पाठींब्याचा फरक निकालावर पडला असून प्रभाग क्रमांक 16 मधून निलेश चौधरी विजयी झाले आहे. निलेश चौधरी यांनी बविआच्या शेखर भोईर यांचा पराभव केला आहे.
advertisement
advertisement
या प्रभागातला संपूर्ण निकाल हा राजीव पाटील यांच्या भाजप उमेदवाराच्या प्रचारानंतर फिरला आहे. त्यामुळे राजीव पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांचा गेम केल्याची चर्चा आता वसई विरारमध्ये रंगली आहे.
दरम्यान या निकालानंतर बहुजन विकास आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले निलेश चौधरी विजयी झाले असून बहुजनचे नेते राजीव पाटील यांनी धनंजयला पाडा असे आवाहन केले होते.त्यामुळेच माझा विजय झाल्याचे निलेश चौधरी यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना सांगितले आहे.त्यामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 3:25 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Result 2026 : राजीव पाटलांनी ठाकूरांचा गेम केला, भाजप उमेदवार जिंकून आणला,बविआला मोठा झटका









