2 तास 29 मिनिटांची ही मराठी फिल्म गाजवतेय थिएटर, बॉलिवूडलाही टाकलंय मागे, आतापर्यंत केली रेकॉर्डब्रेक कमाई
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam : 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' या सिनेमाने रिलीजच्या दोन आठवड्यांत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर व बुक माय शोवर चित्रपट ट्रेंडिंग ठरत आहे. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला तब्बल 3.91 कोटींचा गल्ला जमवला होता. जोरदार कमाई करत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
advertisement
advertisement
advertisement
चित्रपटाच्या प्रभावी कथेची मांडणी, कलाकारांची नैसर्गिक अभिनयशैली, मनाला भिडणारे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे हा चित्रपट केवळ एक सिनेमा न राहता एक अनुभव ठरत आहे. समीक्षकांकडूनही या चित्रपटाला भरभरून दाद मिळत असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
सिनेमाच्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो,“मराठी प्रेक्षक दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपटाला नेहमीच मनापासून साथ देतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ला मिळणारा प्रतिसाद प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अपेक्षेपलीकडचा आहे. इतका मोठा आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद आम्ही कल्पनाही केली नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यंत हाऊसफुल शो, प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसणारी भावुकता आणि चित्रपटानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रिया हे सगळं अत्यंत भारावून टाकणारं आहे. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याची संस्कृती हीच मराठी चित्रपटसृष्टीची खरी ताकद आहे".










