Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळावर मोठे बदल, प्रवाशांना दिलासा, मास्टर प्लॅन काय?
Last Updated:
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अवघ्या 19 दिवसांत एक लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे. प्रवासी आणि मालवाहतूक दोन्ही बाबतीत विमानतळाने वेगाने प्रगती केली असून येत्या काळात सेवा अधिक वाढणार आहेत.
मुंबई : डिसेंबर 25 पासून सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अवघ्या 19 दिवसांत प्रवाशांच्या संख्येत एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या कालावधीत एकूण 1,09,917 प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला असून हा विमानतळ प्रवाशांच्या पसंतीस उतरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांत 1 लाख प्रवाशांचा विक्रमी प्रवास
12 जानेवारीपर्यंत 55,934 प्रवासी नवी मुंबई विमानतळावर उतरले तर 53,983 प्रवाशांनी येथून उड्डाण केले.10 जानेवारी रोजी एका दिवसात तब्बल 7,345 प्रवाशांनी प्रवास केला. हा आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक प्रवासी विक्रम ठरला आहे.
या 19 दिवसांत विमानतळावर 734 एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्सची नोंद झाली असून यामध्ये 32 जनरल एव्हिएशन उड्डाणांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बॅगेज हाताळणी व्यवस्था प्रभावीपणे राबवण्यात आली. येणाऱ्या प्रवाशांच्या 40,260 बॅगा तर जाणाऱ्या प्रवाशांच्या 38,774 बॅगा हाताळण्यात आल्या.
advertisement
प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीतही नवी मुंबई विमानतळाने आघाडी घेतली आहे. अवघ्या 19 दिवसांत 22.21 टन मालवाहतूक या विमानतळावरून करण्यात आली. दिल्ली, गोवा आणि बेंगळुरू हे प्रमुख दळणवळणाचे मार्ग ठरले आहेत.
काही दिवसांत 24 तास विमानसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 8 ऑक्टोबर 2025 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर 25 डिसेंबरपासून नियमित उड्डाणांना सुरुवात झाली. पुढील महिन्यात 24 तास विमानसेवा सुरू होणार असून सध्या दर तासाला 10 उड्डाणे किंवा लँडिंग होत आहेत. एप्रिलपर्यंत हा आकडा 20 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 2:22 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळावर मोठे बदल, प्रवाशांना दिलासा, मास्टर प्लॅन काय?









