'कालच्या पोरींनी यावं आणि...', सागरला नको नको ते बोलणाऱ्या तन्वीवर विशाखा सुभेदारचा हल्लाबोल, चांगलंच झापलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
BBM6 Sagar Karande vs Tanvi Kolte Fight: टास्कच्या गरमागरमीत तन्वी थेट सागरच्या प्रोफेशनवर गेली त्यानंतर एकच राडा झाला. आता याच वादात सागरची जुनी सहकलाकार विशाखा सुभेदारने उडी घेत तन्वीला चांगलंच सुनावलं आहे.
सर्वाधिक वादग्रस्त मानल्या जाणाऱ्या बिग बॉस या गेम शोची फॅन फोलोविंग खूप मोठी आहे. कितीही टीका झाली तरीही दरवर्षी हा शो त्याच उत्साहाने पाहिला जातो. नुकतंच बिग बॉस मराठीचं सहावं पर्व सुरू झालं असून एक आठवडा पूर्ण होत नाही, तोच घरामध्ये दररोज नवे भूकंप पाहायला मिळत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये नवख्या कलाकारांनी आणि नव्या चेहऱ्यांनी आपलं स्थान मिळवलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
दुसऱ्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे तन्वीला रडू आलं आणि सागरशी शांतपणे बोलून तिने त्यांच्यातील भांडणही संपवलं. मात्र, त्यानंतर काही तासांतच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये सागर आणि तन्वी यांच्या पुन्हा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. टास्कच्या गरमागरमीत तन्वी आणि सागर यांचा आवाज चढला. तन्वी थेट सागरच्या प्रोफेशनवर गेली आणि सागर तिच्यावर धावून आला.
advertisement
कॅप्टन्सीच्या ‘बीबी फार्म’ टास्कदरम्यान तन्वी सागरला कारंडेला म्हणते, “हा टास्क थांबवलाय. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तू कॉमेडी करत जातोस. तुला काय वाटतं का कॉमेडी करतोस.” यानंतर सागर कारंडे म्हणाला, “माझं ते प्रोफेशन आहे. कॉमेडी हे माझं काम आहे.” यानंतर या वादात घरातल्या इतर सदस्यांनी मध्यस्थी केली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विशाखा पुढे म्हणाली, "असो.. शब्द पलटवले तिने नंतर..! पण ही तन्वी पहिल्याच आठवड्यात साधारण 10 व्या week ला खेळतेय असं का खेळतेय? लगेचच दुसऱ्यांना तू मला सपोर्ट करणार का वैगरे??? अगं असं काय केलंयस इतरांसाठी कीं तू त्यांच्याशी डील करतेयस.. आधी "दिल" तर जिंक त्यांचं..! ते मला वाटतं तिला शक्य नाही.. किरकिर कर्कश आवाज..! शी."
advertisement









