Vasai Virar Election Result 2026 : वसई विरारमध्ये भाजपाला मोठा झटका, हितेंद्र ठाकूरांच्या तीनही श्रीमंत उमेदवारांनी मारली बाजी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
निकालात भाजपला मोठा धक्का बसला आहे, तर निकालात बहुजन विकास आघाडीच्या दोन श्रीमंत उमेदवारांनी गुलाल उधळला आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने महापालिका निवडणुकीत खातं उघडलं आहे.
Vasai Virar Election Result 2026 : वसई विरार महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सूरूवात झाली आहे. या मतमोजणीत आता पहिला निकाल समोर आला आहे. या निकालात भाजपला मोठा धक्का बसला आहे, तर निकालात बहुजन विकास आघाडीच्या दोन श्रीमंत उमेदवारांनी गुलाल उधळला आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने महापालिका निवडणुकीत खातं उघडलं आहे.
वसई महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती अजीव पाटील, प्रशांत राऊत आणि प्रफुल साने हे उमेदवार विजयी ठरले आहेत. यामध्ये अजीव पाटील यांची 291.65 करोड इतकी संपत्ती आहे, तर प्रफुल्ल साने यांची 30 करोड संपत्ती आहे. आणि प्रशांत राऊत यांच्याकडे 1 कोटीची संपती आहे. ठाकूर यांचे हे तीनही श्रीमंत उमेदवारांनी निडणुकीत गुलाल उधळला आहे.
advertisement
प्रभाग 4 मधून बविआचे 4 उमेदवार विजयी
वसई विरार महापालिकेचा पहिला निकाल हाती आला आहे.प्रभाग क्रमांक ४ मधून बहुजन विकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी ठरले आहेत.बहुजन विकास आघाडीच्या माजी सभापती प्रशांत राऊत, अमृता चोरघे, सुमन ममता दुर्गेश, प्रफुल्ल साने आणि अजीव पाटील विजयी झाले आहेत.
उमेदवारांचा तपशील
बविआ : 113
भाजप : 95
advertisement
शिवसेना शिंदे गट :27
शिवसेना ठाकरे गट : 89
राष्ट्रवादी अजित पवार : 13
एमआयएम : 7
बसपा :14
काँग्रेस :10
वंचित : 12
अपक्ष 167
एकू्ण : 547
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 1:54 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Election Result 2026 : वसई विरारमध्ये भाजपाला मोठा झटका, हितेंद्र ठाकूरांच्या तीनही श्रीमंत उमेदवारांनी मारली बाजी










