2 तास 19 मिनिटांची ही क्राइम थ्रिलर फिल्म, अंगावर शहारे आणणारा प्रत्येक सीन, डोकं सुन्न करणारा क्लायमॅक्स
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Crime Thriller Film : ओटीटीवरील एका क्राइम थ्रिलर फिल्ममध्ये प्रत्येक सीनमध्ये अंगावर शहारे आणणारा प्रत्येक सीन आहे. तर डोकं सुन्न करणारा क्लायमॅक्स आहे.
advertisement
मॉलिवूड सुपरस्टार ममूटी यांचा ‘कलामकावल’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि कथा, मांडणी व दिग्दर्शनामुळे चाहते खूपच खूश झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन जितीन के जोश यांनी केले असून समीक्षकांनीही याला चांगले रिव्ह्यू दिले.
advertisement
advertisement
advertisement
'कलामकावल'ची कथा ‘जयकृष्णन’ नावाच्या स्पेशल ब्रांच अधिकाऱ्याभोवती फिरते, ज्याला सांप्रदायिक गोंधळाशी संबंधित एका प्रकरणाचा तपास सोपवण्यात येतो. एका तरुणीच्या पळून जाण्याने ही कथा सुरू होते, जी सुरुवातीला साधी वाटते; पण हळूहळू ती गुंतागुंतीच्या कोड्यात बदलते. अनेक घटना एकमेकांशी जोडल्या जातात आणि तमिळनाडू क्राइम ब्रांचचे अधिकारी ‘स्टॅनली दास’ तपासात सामील होताच प्रकरण आणखी गंभीर होते. अधिकारी या सगळ्या गोंधळामागील सत्य शोधू लागतात तेव्हा कथेत ताण वाढतो. ममूटी यांनी तमिळनाडू पोलिसांच्या क्राइम ब्रांचमधील ‘एसआय स्टॅनली दास’ ही भूमिका साकारली आहे. चित्रपटात एका धोकादायक सिरियल किलरची कथाही दाखवण्यात आली आहे.
advertisement
विनायकन केरळ पोलिसांच्या स्पेशल ब्रांचमधील ‘एसआय जयकृष्णन’ची भूमिका साकारत आहेत. गिबिन गोपीनाथ ‘आनंद’च्या भूमिकेत आहेत, तर गायत्री अरुण ‘शायनी’ची भूमिका करत आहेत. राजिशा विजयन ‘दिव्या’च्या भूमिकेत असून, श्रुती रामचंद्र ‘दीपा’ची भूमिका साकारत आहेत. अझीज नेदुमंगड ‘एसआय बाबू विजयन’च्या भूमिकेत आहेत, तर कुंचन ‘मॅथ्यू’ आणि बीजू पप्पन ‘एसपी थॉमस’ची भूमिका करत आहेत. अभिनेत्री मालविका मोहनन ‘श्रुती’च्या भूमिकेत दिसते.
advertisement










