संभाजीनगरात MIM तर मालेगावात इस्लामिक पार्टीची मुसंडी, दोन ठिकाणी धक्कादायक कल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकांचा निकाल आता हाती येत आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरशी करताना दिसत आहे. पण दोन ठिकाणी धक्कादायक कल हाती लागत आहेत.
राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकांचा निकाल आता हाती येत आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरशी करताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील पक्ष बऱ्याच ठिकाणी पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. पण काही महानगर पालिकांमध्ये महाविकास आघाडी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. एकीकडे प्रस्थापित पक्षांच्या कामगिरीची चर्चा होत असताना एमआयएम आणि इस्लामिक पार्टीने मुख्य प्रवाहातील पक्षांना जोरदार धक्के देताना दिसत आहे.
मालेगावात इस्लामिक पार्टीचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. इथं भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, इस्लाम पार्टी आणि AIMIM यांच्यात बहुरंगी राजकीय सामना रंगताना दिसत आहे. इथं ८४ पैकी ४६ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या इस्लामिक पार्टीला चांगलं यश येताना दिसत आहे. सुरुवातीच्या काही कलांमध्ये इस्लामिक पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे.
advertisement
विशेष म्हणजे इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत ‘मालेगाव सेक्युलर फ्रंट’ची स्थापना केली असून, ही आघाडी ८४ जागांवर उमेदवार उभे करत निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.
दुसरीकडे, संभाजीनगरात एमआमएम पार्टी प्रस्थापितांना धक्के देताना दिसत आहे. इथं एमआयएम हा पक्ष भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा पक्ष ठरत आहे. इथं एमआयएमने शिवसेना शिंदे गटासह, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या दिग्गज पक्षांना धक्का दिला आहे. इथं भाजप 18, शिवसेना शिंदे गट -11, शिवसेना UBT - 7, एमआयएम - 12, काँग्रेस - 4, राष्ट्रवादी- 2, राष्ट्रवादी SP- 1 आणि इतर एक जागेवर आघाडी घेतली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 12:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगरात MIM तर मालेगावात इस्लामिक पार्टीची मुसंडी, दोन ठिकाणी धक्कादायक कल










