CSMC election results: छ.संभाजीनगरमध्ये भाजपची आघाडी, MIM ने गेम फिरवला, शिंदे गटाला शॉक

Last Updated:

संपूर्ण मराठवाड्यांचं लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण मराठवाड्यांचं लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढत असल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण, मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप २२ जागांवर आघाडीवर आहे. तर  शिवसेना शिंदे गट आता तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. इथं एमआयएमने जोरदार आघाडी घेतली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या ११५ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. टपाली मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मतांची मोजणी सुरू झाली आहे. ११५ पैकी ६६ जागांचा निकाल समोर आला आहे.  भाजपने इथं जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप आतापर्यंत २२ जागांवर आघाडीवर आहे. तर स्वबळावर लढणारी शिवसेना ११ जागांवर आघाडीवर आहे. तर मुस्लिम बहुल भागात एमआयएमने आपला दबदबा कायम राखला आहे. एमआयएमने १२ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपनंतरचा एमआयएम हा दोन नंबरचा पक्ष ठरला आहे.  छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं विजयी खातं उघडलं आहे.  प्रभाग- 2 मधून भाजपा उमेदवार विजय औताडे विजयी झाले आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आतापर्यंत निकाल (आघाडीवर)
भाजप : 22
शिवसेना : 11
शिवसेना UBT : 7
एमआयएम : 12
काँग्रेस : 4
राष्ट्रवादी : 2
राष्ट्रवादी SP : 1
इतर 1
किती टक्के झालं मतदान?
महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल सुमारे 59 टक्के मतदान झाले. बोगस मतदान, वादविवाद, मारामारी वगळता कुठेही मोठा अनुचित प्रकार झाला नाही. महापालिकेच्या 115 जागांसाठी 859 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 1267 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार झाले. अर्ध्या तासात ईव्हीएम बदलण्यात आले. 2015 च्या निवडणुकीत 63 टक्के मतदान झाले होते. प्रभाग पद्धतीमुळे 4 टक्के मतदान घटल्याचे दिसून आले.
advertisement
कुणाची प्रतिष्ठापणाला
भाजपकडून मंत्री अतुल सावे यांनी भाजपचा गड लढवला तर मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेचा किल्ला लढवला. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना उबाठाकडून खिंड लढवली. वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम सुद्धा रणांगणात होते. त्यामुळे इथली निवडणूक चुरशीची ठरली. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीमुळे कुणाचा गेम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
advertisement
(निकाल अपडेट होत आहे)
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CSMC election results: छ.संभाजीनगरमध्ये भाजपची आघाडी, MIM ने गेम फिरवला, शिंदे गटाला शॉक
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement