Mercury Transit: आंधळा मागतो एक..! पण नशीब देणार छप्परफाड; 3 राशींना अनपेक्षित लाभ, विरोधक उद्ध्वस्त
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Astrology Marathi: ग्रहांचे राशीपरिवर्तन राशीचक्रावर मोठा परिणाम दाखवते, ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार मानले जाते. 2026 सालाची सुरुवात ग्रहमानाच्या बदलांमुळे नवीन ऊर्जा आणि संधी घेऊन आली आहे. यामध्ये बुध ग्रहाचे मकर राशीतील गोचर विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.
advertisement
advertisement
मेष - मेष राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे हे गोचर दहाव्या स्थानी होणार आहे, ते करिअर आणि प्रतिष्ठेचे स्थान मानले जाते. या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होईल आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. वडिलांशी असलेले संबंध सुधारतील आणि त्यांनाही लाभ मिळतील. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल वाढेल आणि व्यवसायात घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.
advertisement
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध नवव्या स्थानी गोचर करणार आहे. हे स्थान भाग्य आणि उच्च शिक्षणाशी संबंधित आहे. या काळात नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल आणि कुटुंबाकडून चांगले सहकार्य लाभेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि जीवनशैलीत स्थिरता येईल. कौटुंबिक नात्यांमधील सुसंवाद वाढण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.
advertisement
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचे गोचर त्यांच्याच राशीत म्हणजेच पहिल्या स्थानी (लग्नी) होणार आहे. हे स्थान व्यक्तिमत्व आणि आरोग्याचे प्रतीक आहे. या काळात तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि जुन्या नात्यांमध्ये अधिक घट्टपणा येईल. अपत्यसुखात वाढ होईल आणि जीवनात एक प्रकारचा समतोल अनुभवण्यास मिळेल.
advertisement
मकर राशीच्या लोकांना नवीन योजना सुरू करण्यासाठी ही वेळ अत्यंत योग्य आहे. एकूणच, बुध ग्रहाचा हा बदल या तीन राशींसाठी करिअर, आरोग्य, पैसा आणि कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरणार आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







