Pune Result 2026 : पुण्यात 'कभी खुशी कभी गम', पवारांची सोडचिठ्ठी देणाऱ्या प्रशांत जगतापांचा विजय, लेक जिंकला पण आईला झटका!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Prashant Jagtap Pune Election Result 2026 : माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजित शिवरकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपाने त्यांनाच मैदानात उतरवले होते, मात्र प्रशांत जगताप यांनी त्यांना धूळ चारत विजय खेचून आणला.
Pune Election Result 2026 : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून शहराच्या पूर्व भागातील एका महत्त्वाच्या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. या प्रभागात प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच प्रचंड उत्कंठा पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 18 ड मध्ये काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय संपादन केला आहे. प्रशांत जगताप यांनी भाजपचे अभिजीत शिवरकर यांचा पराभव केला आहे. त्यांनी भाजपचे अभिजीत शिवरकर यांचा पराभव केला आहे. मात्र, त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप यांचा पराभव झाला आहे.
भाजपला धूळ चारत विजय खेचला
विशेष म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत हा विजय मिळवला. ही निवडणूक कौटुंबिक आणि राजकीय संघर्षासाठी अधिक चर्चेत राहिली होती, कारण माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजित शिवरकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपाने त्यांनाच मैदानात उतरवले होते, मात्र प्रशांत जगताप यांनी त्यांना धूळ चारत विजय खेचून आणला.
advertisement
नाकावर टिच्चून विजय मिळवला
प्रशांत जगताप यांच्या या विजयामुळे पुणे महानगरपालिकेत काँग्रेसने आपले विजयाचे खाते उघडले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. अभिजित शिवरकर यांच्या रूपाने भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मतदारांनी शेवटी काँग्रेसच्या बाजूने आपला कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून प्रशांत जगताप यांनी विजय मिळवला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 12:26 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Result 2026 : पुण्यात 'कभी खुशी कभी गम', पवारांची सोडचिठ्ठी देणाऱ्या प्रशांत जगतापांचा विजय, लेक जिंकला पण आईला झटका!










