मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डबल धक्का, मामेभाऊ विवेक कलोती पराभूत, आमदाराचा भाऊही हरला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Vivek Kaloti Defeat: अमरावती महापालिका निवडणूक निकालात काँग्रेसला क्रॉस करून भारतीय जनता पक्ष पुढे निघाला आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत झाल्याने भाजपला मोठा धक्का बसलाय.
अमरावती : अमरावती महानगरपालिकेची सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी लढत अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांची.. मात्र याच लढतीत त्यांचा पराभव झाला आहे. तसेच आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू विवेक भारतीय यांचाही पराभव झाल्याने फडणवीस यांना दुहेरी धक्का बसला आहे. प्रभागातील चारही काँग्रेस उमेदवार दणदणीत मतांनी जिंकले. अमरावती महापालिकेत भाजप १८ जागांवर विजयी झाले आहे तर काँग्रेसने एकाच प्रभागात चार जागांवर विजय मिळवला आहे.
अमरावती महानगरपालिकेमध्ये एकूण ८७ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडला जातो. सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला ४४ जागा आवश्यक असतात. २०१७ साली भारतीय जनता पक्ष ४५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आताही भाजप बहुमत पार करू शकतो, असा अंदाज आहे.
विवेक कलोती फडणवीसांचे मामेभाऊ पराभूत
अमरावती महानगरपालिकेच्या मतमोजणीत बिग फाईटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले. या निकालामुळे अमरावतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल दिसून येत असून सत्ताधारी आघाडीला हा निकाल धक्का मानला जात आहे.
advertisement
फडणवीसांच्या आशीर्वादाने विवेक कलोती यांना थेट स्थायी समिती सभापतीपद मिळाले होते
अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विवेक कलोती यांची २०१८ ला बिनविरोध निवड झाली होती. कलोती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ असल्याने त्यांच्याच आशीर्वादाने कलोती यांना थेट स्थायी समितीचं सभापतीपद मिळाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र त्यानंतर यंदा झालेल्या निवडणुकीत त्यांना महापालिका निवडणूक जिंकण्यात अपयश आले.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 12:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डबल धक्का, मामेभाऊ विवेक कलोती पराभूत, आमदाराचा भाऊही हरला









