Mauni Amavasya 2026 Upay: अमावस्या मौनी असल्यानं रविवारी केलेली 'ही' कामं मोठा परिणाम दाखवणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mauni Amavasya 2026 Upay : मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जुनी पापे धुवून निघतात आणि मन शुद्ध होते. मौनी अमावस्या हे नावच मौन शब्दाशी जोडलेले आहे, म्हणजेच या दिवशी कमी बोलणे आणि मन शांत ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे मनावर नियंत्रण राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात.
मुंबई : तशी पाहायला गेल्यास प्रत्येक अमावस्या खास असते पण, मौनी अमावस्या हिंदू धर्मात विशेष आणि पुण्यदायी मानली जाते. मराठी पौष महिन्यातील अमावस्येला ही तिथी येते आणि तिला वर्षातील सर्वात पवित्र अमावस्याही मानलं जातं. या दिवशी स्नान, दान, पूजा आणि मौन साधना यांना विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, मौनी अमावस्येला केलेले उपाय जीवनातील दुःख, आर्थिक अडचणी आणि पितृदोष दूर करण्यास मदत करतात.
मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जुनी पापे धुवून निघतात आणि मन शुद्ध होते. मौनी अमावस्या हे नावच मौन शब्दाशी जोडलेले आहे, म्हणजेच या दिवशी कमी बोलणे आणि मन शांत ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे मनावर नियंत्रण राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात.
मौन व्रत आणि पवित्र स्नान - मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करा. स्नानानंतर मौन व्रत पाळावे. कमी बोलल्याने मन स्थिर राहते आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
advertisement
पितरांसाठी दान - या दिवशी पितरांच्या शांतीसाठी अन्न, वस्त्र किंवा धनाचे दान करावे. जर श्राद्ध किंवा पिंडदान करणे शक्य नसेल, तर गरीब लोकांना भोजन देणे देखील खूप चांगले मानले जाते.
तर्पण करण्याचा उपाय - मौनी अमावस्येला गंगाजलामध्ये काळे तीळ आणि कुश मिसळून पितरांचे तर्पण करावे. हा उपाय पितृदोष शांत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो.
advertisement
दिवा आणि पाठ करण्याचा नियम - स्नानानंतर पितृ सूक्त किंवा पितृ कवच पठण करावे. संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
तुळशी पूजेतून धनलाभ - संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते आणि धनाची वृद्धी होते अशी मान्यता आहे.
advertisement
पिंपळाच्या वृक्षाची पूजा - मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रीत जल अर्पण करावे. दिवा लावून सात वेळा प्रदक्षिणा घालावी. हा उपाय केल्याने जीवनातील संकटे आणि अडचणी कमी होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 1:56 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mauni Amavasya 2026 Upay: अमावस्या मौनी असल्यानं रविवारी केलेली 'ही' कामं मोठा परिणाम दाखवणार










