Congress: राज्यभरात ब्रँड ठाकरेंना धक्का, 4 पालिकांमध्ये काँग्रेसची सरप्राईज एंट्री
- Published by:Sachin S
Last Updated:
मुंबईसह अनेक ठिकाणी ठाकरे गटाला फटका बसला आहे तर काँग्रेसने अनेक पालिकांमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात 29 महापालिकांचा निकाल आता जवळपास स्पष्ट होत आहे. एकीकडे महायुतीने एकत्र लढत काही बऱ्याच महापालिकांमध्ये आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये कही खुशी कही गम असं वातावरण आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतला. अनेक पालिकांमध्ये काँग्रेसने स्वतंत्र्य लढण्यावर भर दिला. त्यामुळे काँग्रेसला याचा फायदाही झाला आणि नुकसानही झालं. तर मुंबईसह अनेक ठिकाणी ठाकरे गटाला फटका बसला आहे. पण, नगरपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसने निवडलेला स्वबळाचा मार्ग हा काँग्रेसला फायद्याचा ठरल्याची चित्र आहे.
काँग्रेसने लातूर महापालिका निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता राखली आहे. लातूर महानगरपालिका निवडणूक निकाल आता स्पष्ट झाला आहे. लातूरमध्ये ७० जागांपैकी ४३ जागांवर विजय मिळवला आहे. लातूरमध्ये काँग्रेस आता सरकार स्थापन करणारे हे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे, लातूर हा अमित देशमुख यांचा बालेकिल्ला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये आता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख याचे निशाण पुसले जातील, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला आता निकालात चांगलाच फटका बसला आहे.
advertisement
लातूर महापालिकेतील निकाल
एकूण जागा : ७०
काँग्रेस - ४३
वंचित - ०४
भाजप - २२
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - ०१
विजय वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यात पंजा
तर दुसरीकडे चंद्रपूर महापालिका निवडणुकीतही काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस इथं निवडणूक लढवली. वडेट्टीवार यांनी आपला गड राखला आहे. काँग्रेस इथं सर्वात जास्त जागा घेऊन आघाडीवर आहे. दुपारपर्यंत ६६ जागांपैकी काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहे. तर भाजपने 8 जागा जिंकल्याआहे. तर ठाकरे गटाने ५ जागा जिंकल्या आहे.
advertisement
अमरावतीत ठाकूर गड राखणार?
अमरावती महापालिका निवडणुकीमध्येही हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. अमरावती हा काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसने इथं जोरदार टक्कर दिली आहे. जवळपास बऱ्याच प्रभागात आघाडी घेतली आहे.
अमरावती महापालिकेत आतापर्यंत एकूण 87 जागांपैकी 36 जागेचा निकाल घोषित झाला आहे. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने ४ जागा जिंकल्या आहे. राष्ट्रवादी ४ जागा जिंकल्या आहेत.
advertisement
शिवसेना शिंदे गट 01, शिवसेना (उद्धव ठाकरे) 1, बसपा 3, MIM 6 आणि युवा स्वाभिमान पार्टीने 3 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, या ठिकाणी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी भाजपशी फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 2:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Congress: राज्यभरात ब्रँड ठाकरेंना धक्का, 4 पालिकांमध्ये काँग्रेसची सरप्राईज एंट्री









