कोणी विचारही केला नसेल! तन्वी-सोनालीला पछाडून 'या' स्पर्धकाने मारली बाजी, ठरली 'बिग बॉस मराठी 6'ची पहिली कॅप्टन!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
BBM6 First Captain: 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या सीझनमध्ये अभिजीत सावंतला तगडी टक्कर देणारी ही मुलगी, आज बिग बॉस मराठी ६ च्या घराची पहिली 'कॅप्टन' म्हणून मिरवणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तिसऱ्या राउंडमध्ये सोनालीच्या टीमने बाजी मारली आणि त्यांनी प्राजक्ताला बाद करण्याची खेळी खेळली. मात्र, प्राजक्ताने शांत डोकं ठेवलं. बिग बॉसने ऐकवलेलं गुपित कोणाचं आहे, हे तिने अचूक ओळखलं आणि सोनालीला टास्कमधून आऊट केलं. या निर्णायक क्षणी प्राजक्ताने आपल्या अनुभवाचा आणि निरीक्षणाचा असा काही वापर केला की, ती घराची पहिली महिला कॅप्टन बनली.
advertisement
प्राजक्ता शुक्रे हे नाव मराठी घराघरांसाठी नवीन नाही. ज्यावेळी देशात रिॲलिटी शोचं वारं आलं होतं, तेव्हा 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्याच पर्वात प्राजक्ता फायनलिस्ट होती. तिथे विजेता ठरलेल्या अभिजीत सावंतशी तिची मैत्री आणि चुरस आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. योगायोगाने आज ती पुन्हा एकदा एका मोठ्या रिॲलिटी शोमध्ये आपली ताकद दाखवत आहे.
advertisement









