Best Wedding Songs: 2026 मध्ये लग्न आणि Bridel Entry साठी गाणं शोधताय? मग 'या' लिस्टवर एकदा नजर टाकाच

Last Updated:
Best Bridal Entry Songs: २०२६ मध्ये जर तुम्ही नवरी बनणार असाल, तर तुमची एन्ट्री अशी असायला हवी की पाहुण्यांनी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत.
1/7
मुंबई: लग्नाचा सीझन सुरू झाला की वेध लागतात ते ब्राइडल एन्ट्रीचे. पूर्वीचा काळ गेला जेव्हा नवरी मुलगी खाली मान घालून, मंद पावलांनी मंडपात यायची. आता काळ आहे तो कॉन्फिडन्स आणि स्वॅगचा.

advertisement
2/7
२०२६ मध्ये जर तुम्ही नवरी बनणार असाल, तर तुमची एन्ट्री अशी असायला हवी की पाहुण्यांनी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. तुमच्या या खास दिवसाला अधिकच ग्रँड बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अशा काही गाण्यांची लिस्ट, जी सध्या लग्नांमध्ये धुमाकूळ घालत आहेत.

3/7
१. 'सैयां सुपरस्टार' (एक पहेली लीला - २०१५) : जर तुम्हाला थोडी टशन दाखवायची असेल, तर हे गाणं तुमच्यासाठी परफेक्ट आहे. डोळ्यावर काळा चष्मा लावा, नऊवारी किंवा लेहेंग्याचा तोरा सांभाळा आणि 'सैयां सुपरस्टार'वर डान्स करत एन्ट्री करा. जेव्हा नवरी स्वतःच्या नवऱ्याचं कौतुक करत डान्स करत येते, तेव्हा तो माहोलच वेगळा असतो. ही एन्ट्री तुमच्या बोल्ड पर्सनॅलिटीला नक्कीच साजेशी ठरेल.

4/7
२. 'ये तुने क्या किया' (वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा - २०१३) : काही गाण्यांचे शब्दच काळजाला हात घालतात.
२. 'ये तुने क्या किया' (वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा - २०१३) : काही गाण्यांचे शब्दच काळजाला हात घालतात. "सारी दुनिया से जीत के मैं आया हूँ इधर, तेरे आगे ही मैं हारी..." हे ओळी जेव्हा वाजत असतात आणि नवरी हळूवार पाऊलांनी स्टेजकडे सरकेल, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी येईल. जर तुम्हाला तुमची एन्ट्री रोमँटिक आणि तितकीच अर्थपूर्ण ठेवायची असेल, तर हे गाणं नक्की निवडा.
advertisement
5/7
३. 'केसरिया तेरा इश्क' (ब्रह्मास्त्र - २०२२) : रणबीर आणि आलियाच्या या गाण्याने २०२६ मध्येही आपली मोहिनी टिकवून ठेवली आहे. हे गाणं म्हणजे प्रेमाचा उत्सव. पिवळ्या फुलांच्या वर्षावात किंवा लायटिंगच्या झगमगाटात जेव्हा 'केसरिया' वाजायला लागतं, तेव्हा वातावरण एकदम जादुई होतं. एक स्वप्नवत एन्ट्री हवी असेल, तर केसरियाला पर्याय नाही.

6/7
४. 'दिल शगना दा' (फिल्लौरी - २०१७) : हे गाणं आता एक आयकॉनिक ब्राइडल अँथम बनलं आहे. जरी हे गाणं जुनं असलं, तरी आजही नवरीच्या मनातील भीती, आनंद आणि संमिश्र भावना व्यक्त करण्यासाठी यापेक्षा दुसरं चांगलं गाणं नाही. जर तुम्हाला आपली एन्ट्री पारंपरिक आणि भावूक ठेवायची असेल, तर हे पंजाबी गाणं तुमच्या एन्ट्रीला एक वेगळाच फील देईल.

7/7
५. 'प्रेम रतन धन पायो' (२०१५) : राजघराण्यातील नवरीप्रमाणे राजेशाही थाटात एन्ट्री करायची असेल, तर सोनम कपूरचं हे गाणं निवडा. पलक मुच्छलच्या आवाजातील हे गाणं तुम्हाला खऱ्या अर्थाने एखाद्या राजकुमारीचा फिल देईल. सोबतीला तुमच्या बहिणी किंवा मैत्रिणींनी ठराविक स्टेप्स केल्या तर ही एन्ट्री सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागणार नाही.

BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement