कष्ट संपले, प्रगतीचा मार्ग मोकळा झाला, पुढचे 6 महीने या राशींकडे सुख शांतीसह अफाट पैसा येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : नववर्ष 2026 ची सुरुवात होताच वर्षातील पहिला सण मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्याने सूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे.
नववर्ष 2026 ची सुरुवात होताच वर्षातील पहिला सण मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्याने सूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तरायण हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. सूर्य हा ग्रहांचा राजा असल्याने त्याच्या या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर जाणवतो. विशेष म्हणजे पुढील सहा महिने काही राशींसाठी भाग्यवर्धक ठरणार असून धन, यश, प्रतिष्ठा आणि प्रगतीचे नवे मार्ग खुल्या होणार असल्याचे ज्योतिषी सांगतात.
advertisement
ज्योतिषशास्त्रात सूर्याचा उत्तरायण काळ देवांचा काळ मानला जातो. या टप्प्यात सकारात्मक ऊर्जा वाढते, जीवनात स्थैर्य येते आणि अनेक रखडलेली कामे मार्गी लागतात, अशी मान्यता आहे. सूर्य 16 जुलै 2026 पर्यंत उत्तरायणात राहणार असून त्यानंतर कर्क राशीत प्रवेश केल्यावर दक्षिणायन सुरू होईल. मात्र या सहा महिन्यांच्या कालावधीत चार राशींवर सूर्याची विशेष कृपा राहणार आहे. या राशींना आर्थिक समृद्धी, करिअरमध्ये प्रगती आणि वैयक्तिक आयुष्यात आनंद मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
वृषभ राशी - सूर्याचे उत्तरायण वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातील सुखसोयी वाढतील. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे संकेत असून वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. वैयक्तिक आयुष्यात समाधान आणि स्थैर्य अनुभवता येईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









