Mumbai Accident News : नियतीचा क्रूर खेळ! उच्च शिक्षणाचे स्वप्न अधुरेच; बाईक अपघातात 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Last Updated:

Vile Parle East Road Accident News : विलेपार्ले पूर्वेतील मिलन सबवे परिसरात दुचाकी अपघातात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पहाटे झालेल्या या अपघातप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Vile Parle East road accident news
Vile Parle East road accident news
मुंबई : उच्च शिक्षण आणि करिअरची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातलेला आहे. माहीम दर्ग्यावरुन घरी परतत असताना विलेपार्ले पूर्वेतील मिलन सबवे परिसरात झालेल्या दुचाकी अपघातात फरहान शेख (वय 19) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फरहान हा मुंबई मेट्रो प्रकल्पात इंटर्न म्हणून काम करत होता. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला.
स्वप्नांचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, फरहान आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना मिलन सबवे परिसरात एका टेम्पोने त्याच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की फरहान गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी अपघाताची कारवाई करून पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी टेम्पोचालक दीपक धोत्रे (वय 28) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
प्राथमिक तपासात टेम्पोचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फरहानचे वडील शाबुद्दीन शेख (वय 51) यांनी या घटनेबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Accident News : नियतीचा क्रूर खेळ! उच्च शिक्षणाचे स्वप्न अधुरेच; बाईक अपघातात 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement