Amavasya 2026: घरातील मयत व्यक्ती तृप्त होऊन कुटुंबाला देतील आशीर्वाद; मौनी अमावस्येचा अचूक उपाय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mauni Amavasya 2026 Pitra Dosh Upay: मौनी अमावस्या 18 जानेवारीला रविवारी आहे. या दिवशी स्नान आणि दानाचे महत्त्व तर आहेच, पण पितृ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष असतो
मुंबई : मराठी पौष महिना आता संपत आला आहे, या महिन्याच्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हटलं जातंय, मौनी अमावस्या 18 जानेवारीला रविवारी आहे. या दिवशी स्नान आणि दानाचे महत्त्व तर आहेच, पण पितृ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष असतो, त्यांच्या आयुष्यात सतत अडचणी येतात, प्रगती खुंटते. याविषयी काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांच्या मते, या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध हा सर्वात अचूक उपाय आहे.
त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे काय?
पितृ दोष दूर करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपण पवित्र ठिकाणी जाऊन पिंडदान करू शकत नसाल, तर त्रिपिंडी श्राद्ध अवश्य करावे. या विधीमध्ये मुख्य तीन पिंड बनवले जातात: एक सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवासाठी, दुसरा महादेव आणि तिसरा यमराजासाठी. याशिवाय एक पिंड प्रेतांसाठी आणि इतर 16 पिंड आपल्या पूर्वजांसाठी बनवले जातात. हे 16 पिंड अशा पितरांसाठी असतात ज्यांची नावे किंवा मृत्यूची तिथी आपल्याला माहित नाही, किंवा ज्यांचा मृत्यू अपघात किंवा अकाल मृत्यूने झाला आहे. यात एकूण 20 पिंड बनवून विधिवत पूजन केले जाते.
advertisement
त्रिपिंडी श्राद्ध कधी करावे?
हे श्राद्ध कोणत्याही महिन्याच्या अमावस्या तिथीला किंवा कृष्ण पक्षातील कोणत्याही 15 तिथींना करता येते. चैत्र आणि मार्गशीर्ष महिन्याचा कृष्ण पक्ष तसेच पितृपक्ष या विधीसाठी अतिशय उत्तम मानले जातात. अमावस्येच्या दिवशी पितर पृथ्वीवर येतात, त्यामुळे या दिवशी त्यांना तृप्त केल्यास विशेष फळ मिळते.
advertisement
त्रिपिंडी श्राद्ध कुठे करावे?
त्रिपिंडी श्राद्ध कधीही घरी करू नये. हे श्राद्ध नदीवर, पवित्र ठिकाणीच करावे. काशी (वाराणसी) हे या विधीसाठी सर्वोत्तम स्थान मानले जाते. महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या प्रसिद्ध ठिकाणी देखील जाऊ शकता. पितृदोषातून मुक्तता मिळाल्यावर जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 7:36 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Amavasya 2026: घरातील मयत व्यक्ती तृप्त होऊन कुटुंबाला देतील आशीर्वाद; मौनी अमावस्येचा अचूक उपाय








