Health Tips: सतत हाडांचा त्रास? असू शकतो गंभीर आजाराचा धोका, अशी घ्या वेळीच काळजी
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
सुरुवातीच्या टप्प्यावर निदान न झाल्यास रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणे गरजेचे आहे.
अलीकडच्या काळात जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे कॅन्सरसारख्या आजारांचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यातच एक दुर्मिळ पण गंभीर प्रकार म्हणजे हाडांचा कॅन्सर. या आजाराविषयी समाजात अजूनही फारशी जागरूकता नाही. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर निदान न झाल्यास रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच याविषयी माहिती असणे देखील महत्त्वाचे आहे. हाडांचा कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? तसेच काय काळजी घ्यावी? याबाबत माहिती डॉ. राऊत यांनी दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
1. सतत, वाढती वेदना – विशेषतः रात्री किंवा हालचाली करताना वेदना वाढते. 2. हाडं सहज मोडणं – हाडं कमकुवत होऊन किरकोळ आघातानेही मोडतात. 3. हाडाजवळ गाठ किंवा सूज – विशेषतः सांध्याजवळ. 4. अशक्तपणा, थकवा आणि ताप येणे. 5. अचानक वजन कमी होणे. हालचालींमध्ये अडथळा येणे, ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
advertisement
हाडांचा कॅन्सर होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी? हाडांचा कॅन्सर पूर्णपणे टाळता येईल असे नाही, परंतु काही सतर्कता आणि जीवनशैलीतील सुधारणा करून धोका कमी करता येतो: हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन D, प्रोटीनयुक्त आहार आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी, सुकामेवा याचा समावेश करू शकता. हाडं आणि स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी चालणे, योगा, स्ट्रेचिंग अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे व्यायाम करणे गरजेचे आहे धुम्रपान शरीरातील पेशींवर वाईट परिणाम करते आणि कॅन्सरचा धोका वाढवते. त्यामुळं धुम्रपान टाळणे गरजेचे आहे.
advertisement
औद्योगिक क्षेत्रात काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करा. त्यामुळे केमिकल्स व किरणोत्सारापासून बचाव करता येऊ शकतो. काही प्रकारचे कॅन्सर आनुवंशिक असतात. जोखीम असल्यास वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. कसलीही गाठ किंवा वेदना दीर्घकाळ असल्यास दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच उपचार सुरू करावेत.


