तुम्ही अशी E Bike पाहिली नसेल! 4 गिअर आणि रेंजही दमदार, लूक पाहून लगेच कराल बूक
- Published by:Sachin S
Last Updated:
आता एक अशी ईलेक्ट्रिक बाइक आली आहे, जिच्यामध्ये गिअरबॉक्स आहे आणि आवाज सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही ई-बाईक चालवताय की पेट्रोल बाइक चालवताय, हे कळणार सुद्धा नाही.
भारतात सध्या ईलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे लोकांचा चांगलाच कल वाढला आहे. वाढते पेट्रोलचे दर आणि प्रदुषणाच्या समस्येमुळे ईलेक्ट्रिक वाहन फायदेशीर ठरत आहे. पण, बाईक चालवण्याचा अनुभव असल्यामुळे सायलेंट धावणाऱ्या बाइक ईलेक्ट्रिक बाइकचं ताळमेळ लवकर काही जमत नाही. पण, आता एक अशी ईलेक्ट्रिक बाइक आली आहे, जिच्यामध्ये गिअरबॉक्स आहे आणि आवाज सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही ई-बाईक चालवताय की पेट्रोल बाइक चालवताय, हे कळणार सुद्धा नाही.
advertisement
या बाइकचं नाव आहे Matter Era 5000 Plus. ही एक ईव्ही पण फ्युचरिस्टिक अशी बाइक आहे. बाईकच्या फ्रंटमध्ये प्रोजेक्टर LED हेडलॅम्प आणि LED DRLs दिले आहेत, जे याला शार्प आणि अग्रेसिव्ह लूक देतो. साईड प्रोफाईलमध्ये फ्युएल टँकसारखा दिसणारा भाग आहे, पण तिथे बॅटरी आहे. एखाद्या स्पोर्ट बाइक सारखाच या बाइकचा लूक आहे. या बाइकमध्ये स्प्लिट सीट सेटअप, अलॉय व्हील्स आणि टेपर्ड टेल सेक्शन दिले आहे.
advertisement
Matter Era 5000 Plus मध्ये 7-इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले आहे. यासोबतच रायडरला याच स्क्रीनवर स्पीड, बॅटरी लेव्हल, ट्रिप डिटेल्स आणि राइडशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती मिळते. तसंच यामध्ये रायडर प्रोफाईल, स्मार्टफोन नोटिफिकेशन आणि नेव्हिगेशन सारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय स्क्रीनमध्ये बाईकशी संबंधित माहिती देणारे व्हिडिओ आणि सेटिंग्स मेनू देखील आहेत.
advertisement
5 kWh बॅटरी - Matter Era 5000 Plus मध्ये 5 kWh ची बॅटरी दिली आहे, जी इन-बिल्ट लिक्विड-कूलिंग सिस्टमसह येते. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये लिक्विड कूलिंग हे पहिल्यांदाच तुम्हाला या बाइकमध्ये पाहण्यास मिळेल. बॅटरी जर गरम झाली तर ही सिस्टिम तिला थंड ठेवण्याचा प्रयत्न करते. या बाइकची रेंजही १२५ किमी इतकी आहे.
advertisement
४ गिअर बॉक्स - या बाईकमध्ये 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. Matter Era 5000 Plus मध्ये 10.5 kW चा परमनंट मॅग्नेट मोटर दिला आहे, जो या गिअरबॉक्सशी जोडला गेला आहे. साधारणपणे इलेक्ट्रिक बाईक्स सिंगल-स्पीड ट्रान्समिशनसह येतात, परंतु येथे गिअरबॉक्स रायडरला जास्त कंट्रोल आणि इंजिन ब्रेकिंगसारखा अनुभव देते.
advertisement
Matter Era 5000 Plus मध्ये Eco, City आणि Sport असे ३ रायडिंग मोड्स आहेत जे Sport मोडमध्ये याची टॉप स्पीड 105 किलोमीटर प्रति तास इतका आहे. तर 0 ते 60 kmph चा वेग ही बाईक 6 सेकंदात गाठते. तसंच Matter Era 5000 Plus ची सीट हाईट 790 mm आहे, ज्यामुळे मध्यम उंचीच्या रायडर्ससाठी ही बेस्ट आहे. बाईकचाा कर्ब वेट 169 किलोग्राम आहे. बाईकमध्ये चार्जिंग पोर्ट साईडला दिला आहे.
advertisement









