मक्याची पुन्हा घसरण: कृषी मार्केटमध्ये वेबसाईटवरील सायंकाळी 6.15 वाजताच्या रिपोर्टनुसार, राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज मक्याची एकूण आवक 1 हजार 209 क्विंटल इतकी झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 853 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1400 ते जास्तीत जास्त 1800 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजार भाव मिळाला. मक्याला शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज पुन्हा घट झाली आहे.
advertisement
कांद्याचेही दर घसरले: राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 हजार 277 क्विंटल इतकी झाली. यापैकी 795 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 600 ते 1650 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 417 क्विंटल कांद्याला प्रतीनुसार कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 2800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात काहीशी घट दिसून येत आहे.
सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण: राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज 297 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 269 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3700 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच बुलढाणा आणि छत्रपती संभाजी नगर मार्केट मध्ये 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सोयाबीनच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे.