गुळाच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 3823 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली बाजारात 2697 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4165 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 360 क्विंटल गुळास 4501 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
बिबट्या चक्क नारळाच्या झाडावर, सांगलीतला VIDEO
advertisement
शेवग्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 4 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात सर्वाधिक 3 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 35000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल शेवग्यास 10000 ते 20000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
डाळिंबाची आवक दबावात
गेल्या अनेक दिवसांपासून बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. यामुळे डाळिंबाचे भाव चांगलेच कडाडले आहेत. आज राज्याच्या मार्केटमध्ये केवळ 12 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक पुणे बाजारात राहिली. त्यास 15000 रुपये बाजारभाव मिळाला.





