advertisement

नोकरी सोडून इंजिनिअर रमला गावी, शिंपल्याचा केला यशस्वी प्रयोग, वर्षाला 30 लाख कमाई

Last Updated:
नोकरीचे ओझे झुगारून आधुनिक तंत्रज्ञान आणि अभ्यासू कौशल्य आत्मसात करत शिंपल्यांपासून मोती उत्पादनाची यशोगाथा रचली आहे. यामधून ते वर्षाला 30 लाखांच्या वरती कमाई करतात.
1/7
शेती हा पाहिला गेले तर तोट्यात जाणारा व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक तरुण आज शेतीपूरक व्यवसायांकडे वळताना दिसतात. यापैकीच एक सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आंधळी येथील मयूर जगदाळे हा तरुण होय. त्याने नोकरीचे ओझे झुगारून आधुनिक तंत्रज्ञान आणि अभ्यासू कौशल्य आत्मसात करत शिंपल्यांपासून मोती उत्पादनाची यशोगाथा रचली आहे. यामधून ते वर्षाला 30 लाखांच्या वरती कमाई करतात.

2/7
सांगली जिल्ह्यातील पलूस हा द्राक्ष, ऊस उत्पादनातील आघाडीचा तालुका आहे. मात्र आंधळी येथील इंजिनिअर मयूर जगदाळे यांनी नवीन प्रयोग करण्याचे ठरविले. त्यांनी शिंपल्याची आणि मोत्याची शेती केली.

3/7
मयूर जगदाळे यांनी मोती उत्पादनाविषयी उत्सुकता निर्माण झाल्यामुळे इंटरनेट आणि अन्य स्त्रोतामधून त्याचा अभ्यास केला. सन 2012 मध्ये भुवनेश्वर (ओरिसा) येथील केंद्रशासित संशोधन केंद्राला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. सन 2018 मध्ये घरपरिसरातच आधुनिक तंत्रज्ञानासह व्यवसायाची उभारणी केली. आज पूर्णवेळ ते सॉफ्टवेअर इंजिनिअर पत्नी प्रियांका यांच्या साथीने शेती आणि उद्योगांमध्ये रमले आहेत. वडिलांसह आई रेखा यांचेही प्रोत्साहन, मार्गदर्शन मिळते.

4/7
त्यांनी 13 बाय 13 फूट आकारावर दोन फिरते बायोफ्लॉक टँक बनवले आहेत. यांची क्षमता प्रति टँक 10 हजार लिटर पाण्याची आणि तीन हजार लिटर शिंपल्यांची आहे. पैकी ट्रे रचनेत प्रति टँक 375 ट्रे तर प्रति ट्रेमध्ये आठ शिंपले ठेवण्यात येतात. दुसरा प्रकार बॉक्स रचनेचा असून त्यामध्ये 30 बॉक्स आणि प्रति बॉक्समध्ये 40 ते 50 शिंपले आहेत. शिंपला समूहात ठेवल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. तो अधिक चांगल्या प्रकारे वाढतो. त्यानुसार टँक रचनेचा प्रकार ठेवला आहे.

5/7
प्रति शिंपल्यात दोन्ही बाजूला यानुसार तीन हजार शिंपल्यांमध्ये मिळून सहा हजार मोतीबीज ठेवण्यात येते. एक बॅच ही दीड वर्षाची आहे. त्या कालावधीत 500 शिंपल्यांची मरतूक झाली तरी 2500 पर्यंत शिंपले जिवंत मिळतात. प्रति टँक सॉर्टिंग- ग्रेडिंग करून चार हजारांच्या आसपास दर्जेदार मोती उपलब्ध होतात.

6/7
शिंपले कोलकाता येथून तर मोतीबीज इंडोनेशिया येथून व्यावसायिकांच्या माध्यमातून उपलब्ध होते. आठवड्यातून एकदा टँकमधील 25 टक्के पाणी सोडून देण्यात येते. त्याचा शेतीला वापर होतो. शिंपल्याचे खतमिश्रित हे पाणी पिकांना उपयोगी ठरते.

7/7
यामध्ये कॅल्शिअम कार्बोनेट किंवा मदर ऑफ पर्ल घटकाच्या वापरानुसार आणि ग्रेडनुसार दर मिळतो. या मोत्यांना औषधनिर्मिती, आयुर्वेदिक, सौंदर्यप्रसाधने आणि अलंकार, ज्वेलरीसाठी मागणी आहे. विक्री हैदराबाद, राजस्थान तसेच परदेशात मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), हाँगकाँग, कतार येथे निर्यातदारांमार्फत होते. कारागिरांच्या मदतीने मोत्यांपासून आकर्षक ज्वेलरीही मयूर तयार करून देतात.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement