APMC Market : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
यामध्ये कांद्याचे दर हे कोसळलेले पाहायला मिळाले. तर लिंबाच्या दरात तेजी कायम आहे.
सांगली : राज्यातील कृषी मार्केटमध्ये आज दरांच्या बाबतीत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आज मोठी आवक झाली. यामध्ये कांद्याचे दर हे कोसळलेले पाहायला मिळाले. तर लिंबाच्या दरात तेजी कायम आहे.
कांद्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 61 हजार 519 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 93 हजार 014 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 326 ते 1108 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 560 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Weather Alert : महाराष्ट्रावर अवकाळी संकट, वादळी वाऱ्यासह बुधवारी पाऊस कोसळणार, 24 जिल्ह्यांना अलर्ट
advertisement
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 736 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 437 क्विंटल लिंबूस 2500 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव सर्वात कमी मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 71 क्विंटल लिंबूस 11542 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1365 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 926 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 12000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 407 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात 290 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 800 ते 1800 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 9:59 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?








