advertisement

बांगलादेशने पायावर धोंडा मारला... वर्ल्ड कपनंतर आता क्रिकेटमधूनच बाहेर व्हायची वेळ!

Last Updated:

बांगलादेश क्रिकेटमध्ये सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. बोर्डाच्या कामात हस्तक्षेप केले तर त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर होतील, असा इशारा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांच्याच सरकारला दिला आहे.

बांगलादेशने पायावर धोंडा मारला... वर्ल्ड कपनंतर आता क्रिकेटमधूनच बाहेर व्हायची वेळ!
बांगलादेशने पायावर धोंडा मारला... वर्ल्ड कपनंतर आता क्रिकेटमधूनच बाहेर व्हायची वेळ!
मुंबई : बांगलादेश क्रिकेटमध्ये सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. बोर्डाच्या कामात हस्तक्षेप केले तर त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर होतील, असा इशारा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांच्याच सरकारला दिला आहे. बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाने मागच्या वर्षी झालेल्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीत कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय समिती बनवली आहे. या समितीला त्यांचा रिपोर्ट द्यायचे आदेश सरकारने दिले आहेत. ही समिती अनियमितता, हेराफेरी आणि सत्तेचा दुरुपयोग अशा आरोपांची चौकशी करणार आहे.

बांगलादेश बोर्डाची आयसीसीसोबत चर्चा

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याबाबत आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडल्या गेलेल्या कोणत्याही क्रिकेट बोर्डामध्ये सरकारचा हस्तक्षेप आयसीसीच्या नियमांविरोधात आहे, असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे. सरकारचा हस्तक्षेप असल्याचं निष्पन्न झालं तर आयसीसी नियमांनुसार बांगलादेशवर बंदीचा धोकाही आहे. याआधी झिम्बाब्वे आणि श्रीलंका या देशांच्या क्रिकेट बोर्डावरही निलंबनाची कारवाई झाली होती.
advertisement

तमीम इक्बालच्या आरोपांमुळे वाद चिघळला

हा संपूर्ण वाद बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल याने केलेल्या आरोपांमुळे सुरू झाला. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला, असा आरोप तमीम इक्बालने केला. निवडणुकीआधी अमीनुल यांनी क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून काही जिल्ह्यांचे काऊन्सिलर बदलण्याची मागणी केली, याशिवाय अर्ज भरण्याची तारीखही दोन वेळा वाढवली, असा आरोप तमीम इक्बाल याने केला. अमीनुल इस्लाम यांनी मात्र तमीम इक्बालचे हे आरोप फेटाळून लावले.
advertisement
1 ऑक्टोबरला तमिम इक्बालने त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि मग 6 ऑक्टोबरला निवडणुका झाल्या, तरीही वाद थांबला नाही. ढाका क्लब अधिकारी आणि इतरांनी निवडणुकांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. यानंतर काही तासांमध्येच क्रीडा मंत्रालयाला त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा लागला, कारण या उमेदवाराचे राजकीय संबंध सोशल मीडियावर समोर आले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीनंतर परिस्थिती आणखी बिघडली. ढाक्यामधल्या अनेक क्लबनी सध्याचं बोर्ड बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आणि ढाका लीगवर बहिष्कार टाकला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बांगलादेशने पायावर धोंडा मारला... वर्ल्ड कपनंतर आता क्रिकेटमधूनच बाहेर व्हायची वेळ!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement