advertisement

Weather Updats: शिमला, काश्मीर नव्हे महाराष्ट्राच्या रस्त्यावर बर्फाची चादर, कोल्हापूर, सांगलीत आलं तुफान, VIDEO

Last Updated:

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये जोरदार गारपीट झाली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या भागांमध्ये इतकी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली

News18
News18
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
कोल्हापूर : एकीकडे दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे. राज्यभरात उन्हाचा पार वाढत चालला आहे. पण, अचानक वातावरणामध्ये बदल झाला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये जोरदार गारपीट झाली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या भागांमध्ये इतकी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे की, रस्त्यावर सर्वत्र गारांचा सडा पडला असून रस्ते हे शिमला आणि काश्मिरासारखे झाले आहे.
advertisement
कोल्हापूरच्या सीमेवर मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली, अचानक झालेल्या पावसामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. गारपीट आणि मुसळधार पावसाने काही क्षणात वातावरणात थंडावा आणला. सीमेवर असलेल्या काही गावांमध्ये आणि बेळगावमध्ये जोरदार गारपीटसह पाऊस झाला.
[video width="854" height="480" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/rain-2026-03-aea04977f7e61fb662991aa0d5fe6c4e.mp4"][/video]
मुसळधार पावसाचे बेळगावात थैमान घातलं आहे. गारपीट इतक्या जोरदार झाली की, रस्त्यांवर गारांचा खच पडला. रस्ते आणि महामार्गावर गारपिटीमुळे बर्फाची चादर पसरली होती. गारपिटीमुळे सगळीकडे काश्मिसारखे वातावरण निर्माण झालं होतं.  गारपीटमुळे अनेक भागात नुकसान झालं आहे.
advertisement
सोलापुरातही गारपीट
दरम्यान, कोल्हापूरलगत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील  अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. अक्कलकोट शहरासह तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी लावली.  अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु. घोळसगाव, बोरगाव दे गावातील शेतीला गारपीटी फटका बसण्याची शक्यता आहे. तालुक्यातील गहू, ज्वारी आणि द्राक्ष पिकांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे.  जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाचा हवामान खात्याने इशारा दिला आहे.
advertisement
सांगली शहराला वादळी वाऱ्यासह गारांच्या पाऊसाने झोडपले
दरम्यान, सांगली शहराला सुद्धा ३० ते ४० किलोमीटर प्रतिसाद वेगाने सोसाट्याचा वारा, गारांच्या सांगलीला झोडपलं.  ऐन उकाड्यात हैराण झालेल्या नागरिकांना गारांच्या पावसाने दिलासा दिला.  सुमारे पाऊण तास पडलेल्या पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालं. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं.
लातूरमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांचे नुकसान
तर दुसरीकडे, मराठवाड्यातील​ लातूर शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाच्या ‘यलो अलर्ट’नुसार वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक भागांना झोडपून काढलं. लातूर शहरातही अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव झाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून आली. लहान मुले, महिला पावसात गारा वेचताना दिसून आले. निलंगा तालुक्यातील सरवडी, मुदगड, एकोजी, हाडोळी तसेच अहमदपूर आणि औसा तालुक्यात गारांसह मुसळधार पाऊस झाला. या गारपिटीमुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून आंबा बागांनाही फटका बसला आहे. फळगळ झाल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Updats: शिमला, काश्मीर नव्हे महाराष्ट्राच्या रस्त्यावर बर्फाची चादर, कोल्हापूर, सांगलीत आलं तुफान, VIDEO
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement