योजनेचा मुख्य उद्देश
केंद्र सरकारने देशभरातील बचत गटातील महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना ड्रोनच्या वापराचे प्रशिक्षण देऊन, शेती तसेच इतर व्यावसायिक कामांसाठी त्याचा उपयोग करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
अनुदान आणि आर्थिक सहाय्य किती?
ड्रोन खरेदीसाठी 80% सबसिडी (8 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत) दिली जाणार जाते.
advertisement
उर्वरित रक्कम भरण्यासाठी महिलांना 3% व्याजदराने AIF योजनेअंतर्गत कर्ज दिले जाणार आहे. योजनेत सहभागी झालेल्या महिलांना 15,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देखील दिले जाईल.
ड्रोन किटमध्ये काय मिळते?
अत्याधुनिक ड्रोन यंत्रणा
चार बॅटरी आणि चार्जिंग हब
ड्रोन नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपकरणे
पात्रता निकष काय आहेत?
अर्जदार महिला भारतीय असाव्यात
स्वयंसहाय्यता गटाचे (SHG) सदस्यत्व असणे बंधनकारक.
स्वतःच्या नावावर शेती असावी.
वय 18 ते 37 वर्षे दरम्यान असावे
अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे?
आधार कार्ड
स्थानीय रहिवासी प्रमाणपत्र
पॅन कार्ड
फोन नंबर आणि ईमेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो
SHG ओळखपत्र
शेतीसाठी ड्रोनचा उपयोग कसा होणार?
ड्रोनचा उपयोग नॅनो-खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी केला जाईल. तसेच, जमिनीच्या मोजणीसाठी देखील केला जाईल.
