TRENDING:

शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video

Last Updated:

Agriculture Success: संत सावता महाराज यांच्या अरण गावात एका शेतकऱ्याने आमराई फुलवली आहे. या बागेतून त्यांना दरवर्षी सर्व खर्च वजा जाता तब्बल 70 ते 80 लाख रुपयांचा नफा मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर - पारंपरिक शेतीला आधुनिक प्रयोगांची जोड दिल्यास शेतीतून मोठे उत्पन्न मिळू शकते, याचा उत्तम नमुना माढा तालुक्यातील संत सावता माळी यांच्या अरण गावात आला आहे. येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी शेतीत क्रांतीच केली आहे. अवघ्या साडेआठ एकर क्षेत्रात त्यांनी 43 पेक्षा अधिक जातींच्या आंब्यांची भव्य आमराई फुलवली आहे. या बागेतून त्यांना दरवर्षी सर्व खर्च वजा जाता तब्बल 70 ते 80 लाख रुपयांचा नफा मिळत आहे. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

दत्तात्रय गाडगे यांनी 2018 साली साडेआठ एकर क्षेत्रात आंब्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा प्रयोग धाडसी वाटत असला तरी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने बाग उभी केली. आज त्यांच्या आमराईत सुमारे 11 हजार आंब्याची झाडे आहेत. विशेष म्हणजे या बागेत केशर, लंगडा, जम्बो केशर, नीलम, रत्ना यांसह तब्बल 43 विविध जातींचे आंबे आहेत.

advertisement

Success Story : शेतकऱ्याचा 10 गुंठ्यात प्रयोग भारी, केली कांदा अन् गुलछडीची आंतरपीक शेती, इतक्या लाखाचा नफा

गाडगे यांच्या शेतीमुळे अरण गावात जणू ‘कोकण’च तयार झाल्याचे चित्र पाहायला मिळते. या आमराईतील प्रत्येक झाडापासून सरासरी 100 किलोपर्यंत आंब्याचे उत्पादन मिळते. विविध जातींची लागवड केल्यामुळे बाजारपेठेतही या आंब्यांना चांगली मागणी मिळते. त्यामुळे उत्पादनासोबतच उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे.

advertisement

शरद मँगो आंब्याचा नवा वाण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

विशेष म्हणजे दत्तात्रय गाडगे हे त्यांच्या बागेत कोणत्याही प्रकारची रासायनिक खते वापरत नाहीत. ते सेंद्रिय खतांसह होमिओपॅथी औषधांचा वापर करून आंब्यांची निगा राखतात. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते. याशिवाय त्यांनी स्वतः विकसित केलेला ‘शरद मॅंगो’ हा आंब्याचा नवीन वाण देखील तयार केला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नावावरून या वाणाला शरद मॅंगो असे नाव देण्यात आले असून या वाणाचे पेटंटही त्यांना मिळाले आहे. नव्या प्रयोगांच्या जोरावर गाडगे यांनी शेतीतून मोठे आर्थिक यश मिळवत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल