advertisement

APMC Market: लिंबू, द्राक्षांनी मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?

Last Updated:

APMC Market: सध्या कृषी मार्केटवर इराण-इस्त्रायल युद्धासह बदलत्या हवामानाचा देखील प्रभाव दिसत आहे. कांदा, लिंबू, द्राक्षे आणि केळी दरांचं अपडेट जाणून घेऊ.

+
APMC

APMC Market: लिंबू, द्राक्षांनी मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?

सांगली: महाराष्ट्रातील विविध कृषी मार्केटमध्ये शेतीमालाची मोठी उलाढाल होत असते. सध्या कृषी मार्केटवर इराण-इस्त्रायल युद्धासह बदलत्या हवामानाचा देखील प्रभाव दिसत आहे. रविवारी, 15 मार्च रोजी पुणे, मुंबईसह राज्यातील विविध कृषी मार्केटमध्ये आवक आणि दरांमध्ये चढ-उतार राहिले. कांदा, द्राक्षे, केळी आणि लिंबूची आवक आणि दर यांबाबत अपडेट जाणून घेऊ.
कांद्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 59 हजार 134 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 21 हजार 577 क्विंटल सर्वाधिक आवक अहिल्यानगर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 650 ते 1300 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 125 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
लिंबूला भाव
राज्याच्या मार्केटमध्ये आज 443 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 423 क्विंटल लिंबूस 5250 ते 6700 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव सर्वात कमी मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल लिंबूस 10 हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्षाचे दर काय?
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 919 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 904 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 6000 ते 15000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 170 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात आवक केळीस प्रतीनुसार 1250 ते 3550 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबू, द्राक्षांनी मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
Next Article
8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी? एक्सपर्टनी सांगितले नवे कॅल्क्युलेशन
8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी?
  • 8व्या वेतन आयोगाबाबत तज्ज्ञांचा मोठा अंदाज

  • कोणाला किती फायदा?

  • या तारखेपासून मिळणार एरिअर

View All
advertisement