'इराण युद्धविरामासाठी तयार', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; खार्ग बेटावर पुन्हा हल्ल्याची धमकी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ट्रम्प यांनी असा दावा केलाय की इराण युद्धविरामावर चर्चेसाठी तयार आहे मात्र ते स्वतः आता कोणत्याही प्रकारच्या डीलसाठी तयार नाहीत.
Iran Isreal War : महायुद्धाच्या 16 व्या दिवशी संपूर्ण जगासाठी अमेरिकेकडून एक मोठी बातमी येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे इराण गुडघ्यावर आला असून शांतीची भीक मागत आहे. मात्र अमेरिका सध्या बोलण्याच्या मूडमध्ये नसल्याचं त्यांनी सांगितलंय. याशिवाय इराणचे नवे सर्वोच्च नेते जिवंत आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पश्चिम आशियामध्ये सध्या जोरदार बॉम्बवर्षाव होतो असून इराणच्या तळांवर अमेरिका आणि इस्रायलकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. तर दुसरीकडे इराणकडूनही जोरदार पलटवार होत आहे. परिस्थिती अशी आहे की चारी बाजूंना केवळ कोसळलेल्या इमारती आणि त्यांचा ढिगारा दिसून येत आहे.
'इराण युद्धविरामासाठी तयार', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
युद्धाच्या या टप्प्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजसोबत केलेल्या चर्चेत जो दावा केलाय. त्यामुळे तेहराने ते मॉस्कोपर्यंत एकच खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी असा दावा केलाय की इराण युद्धविरामावर चर्चेसाठी तयार आहे मात्र ते स्वतः आता कोणत्याही प्रकारच्या डीलसाठी तयार नाहीत.
advertisement
याशिवाय ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते जिवंत आहेत का असा प्रश्न उपस्थित करुन खळबळ माजवली आहे.
सध्या या युद्धात अमेरिका आणि इस्रायल मजबूत स्थितीत आहेत. मात्र इराणही काही मागे नाही इराणकडून सातत्यानं अमेरिकेच्या सैन्य तळांवर निशाणा साधण्यात येत आहे. इराणचे सैनिक या तळांवर अचूक हल्ले करत आहेत. यावेळी ट्रम्प यांच्या या वक्तव्यांनी खळबळ उडणं साहजिकच आहे कारण या युद्धात इराणकडून होणारा पलटवार जोरदार अन् चोख आहे.
advertisement
खार्ग बेटावर पुन्हा हल्ल्याची धमकी
NBC News सोबत केलेल्या चर्चेत ट्रम्प यांनी इराणच्या खार्ग बेटावर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. खार्ग बेट पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलं असून गरज भासल्यास इराणच्या या महत्त्वपूर्ण सैन्यतळावर पुन्हा हल्ला होऊ शकतो असं ट्रम्प म्हणाले. NBC News सोबत केलेल्या चर्चेत अमेरिकेनं होर्मूज सामुद्रधुनीवरही वक्तव्य केलं आहे. चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि युकेसारख्या देशांनी आपलं युद्ध स्वतः लढावं असं ट्रम्प यांनी म्हटलंय. या सगळ्या देशांनी आपल्या युद्धनौका होर्मुजमध्ये पाठवाव्यात जेणेकरुन तेलाची वाहतूक सुरु होऊ शकेल असा ट्रम्प यांचा प्लॅन आहे. अमेरिका या समुद्री मार्गावर बारीक लक्ष ठेवेल आणि गरज पडल्यास अमेरिकेचं नौदल या जहाजांना सुरक्षाही पुरवेल असंही ट्रम्प म्हणाले.
advertisement
खरंतर पश्चिम आशियात सुरु झालेल्या या युद्धाचं कारण इराणचा अणु प्रकल्प आहे. अमेरिका आणि इस्रायलला असं वाटतं की इराणनं आपला अणुप्रकल्प बंद करावा. युरेनियम संवर्धन थांबवावं आणि मिसाईलची क्षमताही कमी करावी. मात्र जेव्हा इराणनं या अटी मानण्यास नकार दिला. तेव्हा 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं मिळून इराणवर हवाई हल्ले सुरु केले. इतकंच नाही तर पश्चिम आशियातील हे युद्ध सुरु करण्यासाठी अमेरिकेनं खूप आधीपासून तयारी केली होती. इराणच्या जवळ समुद्रात त्यांच्या युद्धनौका तैनात होत्या. त्यावर विध्वंसक असे बी 2 बॉम्बरही तैनात करण्यात आले होते. मात्र जेव्हा इराण पलटवार करण्यास सुरुवात केली तेव्हा विजय वाटतो तेवढा सोपा नाही हे अमेरिकेला कळून चुकलं. आजही इराणनं आपल्या संभाव्य समझोता करारात अणुप्रकल्प बंद करण्याचं मान्य करावं तरच त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी अट ट्रम्प यांनी टाकली आहे. मात्र अमेरिकेच्या इतर अटी काय असणार याबाबत ट्रम्प यांनी बोलणं टाळलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 8:35 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
'इराण युद्धविरामासाठी तयार', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; खार्ग बेटावर पुन्हा हल्ल्याची धमकी







