शेतकऱ्यांची अडचण कायम
साखर हंगाम अवघ्या महिनाभरावर आला असताना अजूनही शेतकऱ्यांना मागील हंगामातील एफआरपीचा पैसा मिळालेला नाही. बोटावर मोजण्याइतकेच काही कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देतात, तर बहुसंख्य कारखाने ऊस तोडणी करूनही पैसे देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखानदारांच्या दारात व अधिकाऱ्यांच्या दालनात फेऱ्या माराव्या लागत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील मोठा थकबाकीदार गट
advertisement
ऑगस्ट अखेरपर्यंत केवळ सोलापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे तब्बल ४२ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे १८ कोटी रुपये सर्वाधिक थकबाकी आहे.
भीमा सहकारी टाकळी सिकंदर, गोकुळ शुगर, जय हिंद शुगर आचेगाव, सहकार शिरोमणी वसंतराव काळे, मातोश्री लक्ष्मी शुगर, इंद्रेश्वर शुगर आणि सिद्धनाथ शुगर या कारखान्यांकडेही लाखो रुपयांची थकबाकी आहे.
कारखान्यांच्या नावाची यादी
मातोश्री लक्ष्मी शुगर (अक्कलकोट)
गोकुळ शुगर (धोत्री)
जय हिंद शुगर (आचेगाव)
सिद्धनाथ शुगर (तिर्हे)
इंद्रेश्वर शुगर (बार्शी)
सिद्धेश्वर शुगर (सोलापूर)
लोकमंगल गटाचे बीबीदारफळ व भंडारकवठे येथील कारखाने
भैरवनाथ शुगर (आलेगाव व लवंगी)
भीमा सहकारी,(टाकळी सिकंदर)
धाराशिव शुगर (सांगोला)
स्वामी समर्थ शुगर (नेवासा),
गजानन महाराज शुगर (संगमनेर)
गंगामाई इंडस्ट्रीज (शेवगाव)
केदारेश्वर सहकारी (शेवगाव)
किसनवीर सहकारी (सातारा)
खंडाळा तालुका साखर कारखाना
जय महेश (माजलगाव)
कर्मयोगी शंकरराव पाटील (इंदापूर)
समृद्धी शुगर (घनसांगवी)
डेक्कन शुगर (यवतमाळ)
पैनगंगा साखर कारखाना (बुलढाणा)
शेतकऱ्यांचा रोष आणि प्रश्नचिन्हे
शेतकऱ्यांनी घाम गाळून तयार केलेल्या उसाचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत, तर त्यांचा हंगाम डळमळीत होतो. खत, बियाणे, मजुरी यासाठी लागणारे पैसे थकित राहिल्याने त्यांचा शेतीवरील खर्च वाढतो. कारखानदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी आरआरसीसारखी कठोर कारवाई सुरू झाली असली, तरी प्रत्यक्षात थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पोहोचते की नाही, हा प्रश्न अजूनही कायम आहे.