Trumpet Player: 63 वर्षांच्या कलाकारावर वणवण फिरण्याची वेळ, पुण्यातील व्हायरल ट्रम्पेटवाल्या आजोबांची रिअल स्टोरी

Last Updated:

Trumpet Player: ट्रम्पेटचा आवाज कानावर पडला की, वसंत पवार यांचं मन भारावून जात असे. त्यामुळे त्यांनी देखील हे वाद्य शिकण्याचा निर्णय घेतला.

+
Trumpet

Trumpet Player: 63 वर्षांच्या कलाकारावर वणवण फिरण्याची वेळ, पुण्यातील व्हायरल ट्रम्पेटवाल्या आजोबांची रिअल स्टोरी

पुणे: कला माणसाला जगवते आणि कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकदही देते. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील शिरूर गावचे वसंत पवार हे याचं जिवंत उदाहरण आहेत. वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षापासून त्याना ट्रम्पेट वाजवण्याची आवड आहे. आता वयाच्या 63 व्या वर्षी याच ट्रम्पेटच्या सुरांनी ते स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आयुष्यातील अनेक संकटांवर मात करत त्यांनी ट्रम्पेटच्या सुरांतून जगण्याचा मार्ग शोधला आहे.
शिरूर या छोट्याशा गावात जन्मलेले वसंत पवार लहानपणापासूनच संगीताच्या जगात रमले. ट्रम्पेटचा आवाज कानावर पडला की, त्यांचं मन भारावून जात असे. वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षापासून त्यांनी ट्रम्पेट वाजवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू या कलेला त्यांनी आपला जीवनमार्ग बनवला. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कार्यक्रम करून त्यांनी स्वतःचा म्युझिक बँड उभा केला. पण, कोरोना महामारीने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.
advertisement
लॉकडाउनमुळे बँडचे कार्यक्रम बंद पडले. दोन वर्षे काम नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं. याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक आघात झाले. नातवाचा अपघात झाल्याने त्याच्या उपचारासाठी 13 ते 14 लाख रुपये खर्च करावे लागले. त्यानंतर काही काळातच मुलाचा अपघातात मृत्यू झाला. गरोदरपणात मुलगीही दगावली. कुटुंबाची जबाबदारी पुन्हा वसंत पवार यांच्या खांद्यावर आली.
advertisement
वसंत पवार म्हणाले, "नातवंडं, सून आणि उरलेलं कुटुंब कोण सांभाळणार? म्हणून मी ट्रम्पेट वाजवतो. रस्त्याने चालताना जुनी-नवीन गाणी वाजवतो. लोक थोडे पैसे देतात, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. डोक्यावर तब्बल 25 लाखांच्या कर्जाचा डोंगर होता. शेती नसल्याने आणि बँडचा व्यवसाय बंद झाल्याने पुन्हा रस्त्यावरच ट्रम्पेट वाजवण्याचा मार्ग पत्करावा लागला."
आजही वसंत पवार पुणे आणि मुंबईतील लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी ट्रम्पेट वाजवतात. कार्यक्रम नसेल तर वारजे, गुडलक चौकाजवळच्या हॉटेलांसमोर बसून ट्रम्पेट वाजवतात. येणारे जाणारे लोक त्यांना पैसे देतात आणि त्यातून पवार यांचा घर खर्च चालतो. अंगातील कला पाहून कोल्हापूर येथील प्रशांत कुलकर्णी यांनी पवार यांना एक नवीन ट्रम्पेट भेट दिली. त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला.
advertisement
कला कधीच माणसाला उपाशी ठेवत नाही, ती आयुष्य जगायला शिकवते. वसंत पवारांची गोष्ट ही संघर्ष, मेहनत आणि कलेवरील श्रद्धेचं उदाहरण आहे. आयुष्यातील कठीण प्रसंगांमध्येही त्यांनी ट्रम्पेटच्या सुरांना सोडलं नाही. तुम्हालाही वसंत पवार यांना मदत करायची असेल किंवा त्यांना काम देण्याची इच्छा असेल तर ‘+91 97633 89828’ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Trumpet Player: 63 वर्षांच्या कलाकारावर वणवण फिरण्याची वेळ, पुण्यातील व्हायरल ट्रम्पेटवाल्या आजोबांची रिअल स्टोरी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement