Devendra Fadnavis Ajit Pawar : DYSP अंजना कृष्णा प्रकरणी अजितदादा एकटे, CM फडणवीस नाराज?, 'कोणताही नेता असो...'
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:प्रशांत लीला रामदास
Last Updated:
Ajit Pawar DYSP Krishna Anjana : विरोधकांकडून अजितदादांवर टीकेचे बाण सोडले जात असताना आता दुसरीकडे सरकारमध्येही अजितदादा एकटे पडले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : करमाळ्यातील महिला डीवायएसपी आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट फोनवरून दम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांकडून अजितदादांवर टीकेचे बाण सोडले जात असताना आता दुसरीकडे सरकारमध्येही अजितदादा एकटे पडले असल्याची माहिती समोर आली आहे.
करमाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले असल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्री आयपीएस अधिकाऱ्याच्या पाठीशी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित महिला अधिकाऱ्याला ठाम पाठीशी असल्याचा विश्वास दिला आहे. “सरकारमधील कोणताही नेता असो, अधिकाऱ्यांचा सन्मान हा अबाधित राहायलाच हवा,” असा संदेश त्यांनी दिल्याचे सांगितले जाते. फडणवीस यांच्या या खंबीर भूमिकेनंतर अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट डीवायएसपी अंजना कृ्ष्णा यांना दमदाटी केल्याने त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला. तर, दुसरीकडे राजकारणही तापलं. अजितदादांना कार्यकर्त्यांने नव्हे तर एका मध्यस्थाच्या माध्यमातून फोन लावण्यात आल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला होता. दरम्यान, अजित पवार आणि डीवायएसपी अंजन कृ्ष्णा यांच्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेल्या. मात्र स्थानिक राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. आत्ताच्या आत्ता कारवाई थांबवा, असा आदेश अजित पवार यांनी दिला. त्यावेळी मी आपल्याला ओळखले नाही. तुम्ही माझ्या नंबरवर व्हिडीओ कॉल करा, असे अंजना कृष्णा अजित पवार यांना म्हणाल्या. त्यावर तुमच्यात एवढी हिम्मत आली... तुमच्याविरोधात मी कारवाई करेन, असा दम अजित पवार यांनी दिला. दोघांमधल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis Ajit Pawar : DYSP अंजना कृष्णा प्रकरणी अजितदादा एकटे, CM फडणवीस नाराज?, 'कोणताही नेता असो...'