BMC Election : सगळे निकालात व्यस्त असताना शिंदेंनी गेम केला, ठाकरेंना मोठा झटका
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आज सगळे नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निकालात व्यस्त असताना तिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा गेम करून उद्धव ठाकरे यांना मोठा झटका दिला आहे.
BMC Election : मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसायला सूरूवात झाली आहे. आज सगळे नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निकालात व्यस्त असताना तिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा गेम करून उद्धव ठाकरे यांना मोठा झटका दिला आहे.
खरं तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दहिसर विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.कारण शाखा क्रमांक 6 चे उपविभाग प्रमुख उदय सुर्वे व त्यांची पत्नी उज्वला सुर्वे यांच्या सहित शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केला जय महाराष्ट्र केला आहे. आणि मागठाणे विधानसभा आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत उदय सुर्वे व त्यांची पत्नी उज्वला सुर्वे शेकडो कार्यकर्त्यां सहित शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.
advertisement
तेजस्वी घोसाळकरांचा भाजप प्रवेश
दरम्यान काही दिवसांपुर्वी ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने महापालिका निवडणुकीच्या समीकरणात मोठा उलटफेर झाला आहे. तेजस्वी घोसाळकरांच्या प्रवेशामुळे भाजपने उत्तर मुंबईतील आपला बालेकिल्ला आता शिंदे गटाच्या साथीने आणखीच मजबूत केल्याचे चित्र आहे.
पश्चिम उपनगरमधील उत्तर मुंबईत भाजपचे चांगलेच वर्चस्व आहे. शिवसेनेची ताकद या ठिकाणी होती. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंना या भागात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील फूट, भाजप-महायुतीने ठाकरे गटाला चांगलेच धक्के दिले आहेत. दहिसर–मागाठाणे परिसरात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या घटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 11:51 PM IST










